Live Update: बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे शिवसैनिकांकडून शुद्धीकरण

live update

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या जन आशिर्वाद यात्रेची सुरुवात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृर्ती स्थळाला अभिवादन करुन केली. आज नारायण राणे शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर आले होते. त्यानंतर आता बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे शिवसैनिकांकडून शुद्धीकरण केले जात आहे. गोमुत्र शिंपून स्मृर्तीस्थळाचे शुद्धीकरण केले जात आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या, सोमवारी सांगली दौऱ्यावर जाणार आहेत. अंकलखोपच्या पूरग्रस्त भागाची करणार पाहणी करणार असून भिलवडीतील पूरग्रस्तांशी साधणार संवाद आहेत. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार  आहेत.


बीडीडी चाळीतील रहिवाशांना मिळणार हक्काचं घरं

पाहा बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प बांधकामाचा शुभारंभ लाईव्ह

#Live: बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प बांधकामाचा शुभारंभ

#Live: बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प बांधकामाचा शुभारंभ

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Saturday, July 31, 2021


बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा शुभारंभ आज वरळीतील जांभोळी मैदानात होणार आहे. या कार्यक्रमास्थळी आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित झाले आहेत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील नुकतेच उपस्थित झाले आहेत. त्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील आहेत.


संसदीय स्थायी समिती १७ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट या कालावधीत जम्मू -काश्मीर आणि लडाखला भेट देण्याची शक्यता आहे. याबाबतची माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे.


अजूनही संपूर्ण जगभरात कोरोनाचा कहर कायम आहे. कोरोनाचे नवं नवीन व्हेरियंटचा फैलाव होत असल्यामुळे बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १९ कोटी ८५ लाख ४७ हजारांहून अधिक आहे. यापैकी आतापर्यंत ४२ लाख ३२ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून १७ कोटी ९२ लाख ८५ हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.