घरCORONA UPDATEभारतीय नौदलाचे १५-२० जवान कोरोना पॉझिटिव्ह!

भारतीय नौदलाचे १५-२० जवान कोरोना पॉझिटिव्ह!

Subscribe

कोरोना व्हायरसने भारतीय लष्करापाठोपाठ भारतीय नौदालतही शिरकाव केला आहे. मुंबईतील नौदलाच्या तळावरील १५ ते २० नौसैनिकांना कोरोनाची लागण झाली आहे. भारतीय नौदलात करोना व्हायरसची लागण होण्याचे ही पहिलीच घटना आहे. मुंबईतीलच नौदलाच्या रुग्णालयात या नौसैनिकांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. या अगोदर भारतीय लष्करातील ८ जवानांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं.

भारतीय नौदलाच्या करोना पॉझिटिव्ह आढळलेल्या जवानांना मुंबईतील INHS या नेव्ही रुग्णालयात आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे भारतीय नौदालिती नौसैनिक कोणाच्या संपर्कात आले हे शोधून काढले जात आहे. मुंबईच्या किनाऱ्यावर नौदलाचा आयएनएस आंग्रे हा तळ आहे.या तळावरच नौसैनिकांची निवासस्थाने आहेत. आयएनएस आंग्रेवरुन पश्चिम नौदल कमांडच्या वेगवेगळया ऑपरेशन्ससाठी रसद आणि प्रशासकीय मदत दिली जाते. नौदल तळाच्या परिसरातच आवश्यक कामांसाठी हे नौसैनिक फिरले असावेत असा नौदलाचा अंदाज आहे.

- Advertisement -

हे जवान ७ एप्रिल रोजी आढळलेल्या एकाच कोरोनाबाधिताच्या संपर्कात आले होते.. नौदलाच्या जहाजांवर तैनात एखाद्या जवानाला किंवा अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झालीय का? याची चाचपणी अद्याप सुरू आहे. करोनाची लागण झालेल्या नौसैनिकांची आयएनएचएस अश्विनीमध्ये क्वारंटाइनची व्यवस्था करण्यात आली आहे. हे नौदलाचे मुंबईतील रुग्णालय आहे.

या अगोदर लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी लष्करातील आठ जवानांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. यामध्ये दोन डॉक्टर आणि एका नर्सचाही समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -