घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटभारत इजिप्त, दक्षिण आफ्रिकेसह ५५ देशांना कोरोना काळात करणार मदत!

भारत इजिप्त, दक्षिण आफ्रिकेसह ५५ देशांना कोरोना काळात करणार मदत!

Subscribe

कोरोनाचा विळखा दोनशेहून अधिक देशांना बसला आहे. प्रत्येक देश आपापल्यापरीने इतर देशांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत करत आहे. कोरोना व्हायरसविरोधातील लढाईत भारत जगातील वेगवेगळया देशांना औषधांचा पुरवठा करत आहे. पंचप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण अफ्रिकेच्या राष्ट्रप्रमुखांना कोरोना व्हायरसवर प्रभावी औषधांचा पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन ट्वीट करत ही माहिती दिली. मोदींनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की,  “कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा कसा सामना करायचा, याबद्दल दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरील रामाफोसा यांच्याबरोबर चांगली चर्चा झाली. भारताकडून आवश्यक औषधांचा पुरवठा करण्याचे मी त्यांना आश्वासन दिले आहे.”

- Advertisement -

दक्षिण अफ्रिकेबरोबर नरेंद्र मोदी यांनी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह एल सिसी यांच्याबरोबर सुद्धा व्हायरसमुळे निर्माण झालेल्या जागतिक संकटाबद्दल चर्चा केली. “अब्देल फताह एल-सिसी यांच्याबरोबर Covid-19च्या भारत आणि इजिप्तमधील स्थितीबद्दल चर्चा झाली. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी इजिप्तचे प्रयत्न सुरु आहेत, त्याला भारत आपल्यापरीने शक्य ती सर्व मदत करेल” असे मोदींनी दुसऱ्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

अमेरिकेसह ५५ देशांना मदत

‘सरकारनं ५५ देशांना ‘हायड्रोक्सीक्लोरोक्वीन’चा पुरवठा करण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, रशिया, अफगाणिस्तान, भूतान, बांगलादेश, नेपाळ, मलादिव, श्रीलंका, म्यानमार, ओमान, संयुक्त अरब अमिराती, सेशेल्स, दक्षिण आफ्रिका, नायजेरिया, डॉमनिकन रिपब्लिक, युगांडा, इजिप्त, सेनेगल, अल्जेरिया, जमैका, उझबेकिस्तान, कझाकिस्तान, युक्रेन, नेदरलँड, स्लोवानिया, उरुग्वे, इक्वाडोर आणि अन्य देशांचा समावेश आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – भारतीय नौदलाचे १५-२० जवान कोरोना पॉझिटिव्ह!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -