घरCORONA UPDATEआरोग्य कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात, पाचशेहून अधिक डॉक्टरांना कोरोनाची लागण!

आरोग्य कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात, पाचशेहून अधिक डॉक्टरांना कोरोनाची लागण!

Subscribe

कोरोनाशी लढणारे डॉक्टर आणि आरोग्य सेवेतील कर्मचार्‍यांमध्ये कोरोनाचा धोका वाढत आहे. केंद्र सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार देशातील ५४८ डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. वॉर्डबॉय, सफाई कर्मचारी, सुरक्षा रक्षक, लॅब अटेंडन्स, शिपाई यांसारख्या फिल्डवर काम करणाऱ्या कोरोनाबाधीतांची आकडेवारी खूप मोठी आहे.

केंद्राने जाहीर केलेल्या आकडेवारीत केवळ सरकारी हॉस्पिटलमध्ये काम करणारे डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे सगळे कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. मात्र अद्याप नक्की किती आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे या विषयी माहिती समोर आलेली नाहीये. त्याचबरोबर कोणाला संक्रमण होऊन कोरोनाची बाधा झाली आहे ही माहिती देखील सांगण्यात आलेली नाहीये.

- Advertisement -

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या संक्रमणामुळे देशातील अनेक डॉक्टरांचे प्राण गेले आहेत. आत्तापर्यंत देशात कोरोनामुळे किती डॉक्टरांचा मृत्यू झाला याचा नेमका आकडा अद्याप मिळालेला नाहीये. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजधानीत दिल्लीत ६९ डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २७४ नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना झाला आहे.

देशातील कोरोनाबाधितांची संख्या जवळपास ५० हजार झाली आहे. तर १४१८४ रूग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत देशात १६९४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – दुःखद बातमी; दिल्लीत कोरोनामुळे ३१ वर्षीय पोलिसाचा मृत्यू!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -