घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटCoroanavirus: जगात कोरोनाचा कहर सुरुच; कोरोनाग्रस्तांचा आकडा ५० लाखपार!

Coroanavirus: जगात कोरोनाचा कहर सुरुच; कोरोनाग्रस्तांचा आकडा ५० लाखपार!

Subscribe

जगात कोरोनाचे ५० लाखांहून अधिक रुग्ण आढळले असून त्यापैकी २० लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.

जगातील कोरोना विषाणूचा फैलाव दिवसागणिक वाढत आहे. जगातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा ५० लाख पार झाला आहे. यापैकी ३ लाखांहून अधिक कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला. तर दिलासा देणार बाब म्हणजे २० लाखांहून अधिक रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. जगात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे अमेरिकेत आढळले आहे. सध्या अमेरिका कोरोना संक्रमणाचं केंद्र असून तिथे १५ लाखांहून अधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहे. तर त्यापैकी ९३ हजारहून अधिक जणांचा बळी गेला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील ncov2019.live या अधिकृत वेबसाईटच्या आकडेवारीनुसार, जगात ५० लाख ८४ हजार ९३१ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले असून त्यापैकी ३ लाख २९ हजार ७१९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २० लाख २१ हजार ८१३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात हा कोरोनाचा कहर सुरू असताना देखील अनेक देशांनी लॉकडाऊन उठवला आहे. तसंच काही देशांनी पर्यटकांसाठी सीमा खुल्या केल्या आहेत. यामध्ये युरोपियन देश हे सर्वाधिक आहे. शिवाय अमेरिकेतील ५० राज्यांपैकी ३० राज्यांनी लॉकडाऊन उठवला आहे. अमेरिकेत दिवसाला हजारहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. गेल्या २४ तासांत १ हजार ५६१ जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेच्या पाठोपाठ रशिया, ब्राझील, ब्रिटन, स्पेन, इटली या देशांमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

- Advertisement -

सर्वाधिक कोरोनाग्रस्त १० देश

अमेरिका – १५ लाख ८१ हजार ९०३ कोरोनाग्रस्त रुग्ण – ९३ हजार ८०६ मृत्यू

रशिया – ३ लाख ८ हजार ७०५ कोरोनाग्रस्त रुग्ण – २ हजार ९७२ मृत्यू

- Advertisement -

ब्राझिल – २ लाख ९३ हजार ३५७ कोरोनाग्रस्त रुग्ण – १८ हजार ८९४ मृत्यू

ब्रिटन – २ लाख ४८ हजार ८१८ कोरोनाग्रस्त रुग्ण – ३५ हजार ७०४ मृत्यू

स्पेन – २ लाख ३२ हजार ५५५ कोरोनाग्रस्त रुग्ण – २७ हजार ८८८ मृत्यू

इटली – २ लाख २७ हजार ३५४ कोरोनाग्रस्त रुग्ण – ३२ हजार ३३० मृत्यू

फ्रान्स – १ लाख ८१ हजार ५७५ कोरोनाग्रस्त रुग्ण – २८ हजार १३२ मृत्यू

जर्मनी – १ लाख ७८ हजार ५३१ कोरोनाग्रस्त रुग्ण – ८ हजार २७० मृत्यू

तुर्की – १ लाख ५२ हजार ५८७ कोरोनाग्रस्त रुग्ण – ४ हजार २२२ मृत्यू

इराण – १ लाख २६ हजार ९४९ कोरोनाग्रस्त रुग्ण – ७ हजार १८३ मृत्यू


हेही वाचा – ट्रम्प म्हणतात, कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण ही अमेरिकेसाठी अभिमानाची बाब


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -