घरदेश-विदेशCoronavirus Variant: 'नवा सुपर-म्युटंट धोकादायक, ३ पैकी एकाचा जाणार जीव'; ब्रिटनच्या शास्त्रज्ञांचा...

Coronavirus Variant: ‘नवा सुपर-म्युटंट धोकादायक, ३ पैकी एकाचा जाणार जीव’; ब्रिटनच्या शास्त्रज्ञांचा इशारा

Subscribe

जगात गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाने कहर केल्याचे दिसतेय. अशा परिस्थितीत कोरोनाचं थैमान घालणार रूप समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असाच सुरू राहिला तर येणाऱ्या काही दिवसात त्याचे नवीन धोकादायक रूप समोर येईल. आणि ते इतके गंभीर असेल की तीन पैकी एक मनुष्य देखील जीवे मरू शकतो, अशी भीती ब्रिटन सरकारच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

ब्रिटनच्या सायंटिफिक अॅडव्हायझरी ग्रुप फॉर इमर्जन्सीज (SAGE) च्या एका अहवालात असा इशारा देण्यात आला आहे की, या नवीन व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण ३५ टक्क्यांपर्यंत असू शकते. ब्रिटनच्या सायंटिफिक अॅडव्हायझरी ग्रुप फॉर इमर्जन्सीज समूहात सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांचे असे मत आहे की, जेव्हा विषाणू बराच काळ टिकतो, तेव्हा त्याचे म्यूटेशन होण्याची शक्यता असते. सध्या ब्रिटनमध्ये हेच घडत आहे. त्यामुळे शास्त्रज्ञांकडून असे सांगितले जात आहे की, ब्रिटनला हिवाळ्यापर्यंत बूस्टर लस आणावी लागेल. यासह विषाणूची नवीन व्हेरिएंट परदेशातून येण्यापासून प्रतिबंधित करावी लागतील आणि व्हायरस असणाऱ्या प्राण्यांना देखील जीवेमारावे लागणार आहे.

- Advertisement -

येत्या काही दिवसात येणाऱ्या कोरोनाच्या संभाव्य परिस्थितीवर एक अहवाल शास्त्रज्ञांकडून सादर करण्यात आला आहे. ज्यामध्ये या ‘सुपर-म्यूटंट’ व्हेरिएंटचा धोका सांगितला आहे. शास्त्रज्ञांच्या मते, येणारा स्ट्रेन हा दक्षिण आफ्रिकेत आढळणारा बीटा आणि केंटमध्ये सापडलेला अल्फा किंवा भारतात सापडलेला डेल्टा व्हेरिएंटने तयार झाला आहे. जो कोरोना लसीवर देखील निष्प्रभावी ठरेल. यामुळे मृत्यूदर वाढण्याचीही शक्यता आहे. या अहवालाच्या आधारे शास्त्रज्ञांनी पुन्हा एकदा ब्रिटनमधील लॉकडाऊन निर्बंध संपवण्याच्या सरकारच्या नियोजनाबद्दल इशारा दिला आहे. दरम्यान, SAGE अहवालातून असे समोर आले आहे की, कोरोना महामारी अद्याप संपलेली नाही. त्यामुळे सरकारने याबाबत अधिक सतर्क असले पाहिजे.


India Corona Update: गेल्या २४ तासांत बाधितांमध्ये घट तर मृतांमध्ये वाढ; ४१,६४९ नवे रूग्ण, ५९३ मृत्यू

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -