घरदेश-विदेशटकल्या म्हणणे हा देखील लैंगिक छळाप्रमाणे गंभीर गुन्हा; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

टकल्या म्हणणे हा देखील लैंगिक छळाप्रमाणे गंभीर गुन्हा; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

Subscribe

आपण मस्करीत अनेकदा डोक्यावर केस नसलेल्या व्यक्तीला टकल्या म्हणून चिडवतो. परंतु असे चिडवणे भारी पडू शकते. कारण एका न्यायालयाने टकल्या म्हणून हाक मारणे देखील लैगिक छळाप्रमाणे गंभीर गुन्हा आहे असा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.

टोनी फिन नावाच्या व्यक्तीने वेस्ट यॉर्कशायर स्थित ब्रिटिश बंग कंपनीवर अन्यायकारक पद्धतीने वागणूक देत कामावरून काढून टाकणे आणि लैंगिक भेदभाव केल्याचा आरोप केला होता. फिन गेली 24 वर्षे या कंपनीत इलेक्ट्रिशियन म्हणून काम करत होता मात्र गेल्या वर्षी मे महिन्यात त्याला कंपनीतून काढून टाकण्यात आले. या प्रकरणी त्याने कोर्टात धाव घेतली. यावेळी कोर्टाने निकास सुनावताना म्हटले की, एखाद्याला ऑफिसमध्ये टकला म्हणणे, हे लैंगिक शोषणाप्रमाणेच गंभीर गुन्हा आहे असे कोर्टाने म्हटलं आहे.

- Advertisement -

न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले की, “‘टक्कल’ या शब्दाचा लैंगिक छळाशी संबंध आहे. दरम्यान ब्रिटिश बंग कंपनी लिमिटेडच्या वकिलांच्या म्हण्यानुसार, पुरुषांप्रमाणेच महिलांनाही टक्कल पडू शकते हा मुद्दा बरोबर आहे. त्यामुळे या न्यायालयाने निकालात म्हटलं आहे की, टक्कल पडण्याचे प्रमाण महिलांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त आहे. त्यामुळे आम्हाला ते नैसर्गिकरित्या लैंगिक छळाशी संबंधित असल्याचं आढळलेय. या प्रकरणी फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये उत्तर इंग्लंडमधील शेफिल्डमध्ये सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने सुरुवातीला लैंगिक छळ, अयोग्य आणि चुकीच्या पद्धतीने कामावरुन काढणे हे फिनचे दावे कायम ठेवले. तसेच फिनला नुकसान भरपाईबाबत निर्णय घेण्यासाठी पुढील एखादी तारीख निश्चित करणार असल्याचे जाहीर केले आहे.

दरम्यान जगातील अनेक देशांमधील पुरुषांमध्ये टक्कल पडण्याचे प्रमाण झपाट्याने वाढतेय. मात्र ही समस्या अनेकांसाठी अन्यायकारक ठरतेय. त्यामुळे या समस्येकडे सामाजिक समस्या आणि भेदभाव म्हणून पाहिली जातेय. आज अनेक टक्कल पडलेल्या लोकांना निराशाजनक टीकेचा सामना करावा लागतो. त्यामुळे कोर्टाने दिलेला हा निर्णय अनेक पुरुषांसाठी महत्त्वपूर्ण मानला जातोय.


Mumbai Underworld : अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलच्या निशाण्यावर अनेक राजकीय नेते; NIA तपासात माहिती उघड

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -