Mumbai Underworld : अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलच्या निशाण्यावर अनेक राजकीय नेते; NIA तपासात माहिती उघड

underworld don chhota shakeel gave contract to kill many political leader in maharashtra nia report
Mumbai Underworld : अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलत्या निशाण्यावर अनेक राजकीय नेते; NIA तपासात माहिती उघड

एनआयने शुक्रवारी अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचे दोन जवळचे सहकारी, आरिफ अबू बकर शेख आणि शब्बीर अबू बकर शेख या दोघांना टेरर लिंक प्रकरणी अटक केली आहे. दरम्यान या दोघांना काही राजकारण्यांच्या हत्येचे कंत्राटही देण्यात आल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. एनआयएच्या माहितीनुसार, आरोपी शकील दोन्ही आरोपींना नियमित पैसे पाठवत असे. या पैशातून शकीलला मुंबईत दहशत पसरवायची होती आणि त्यासाठी काही नेत्यांनाही डी कंपनीच्या टार्गेटवर ठेवण्यात आले होते.

एनआयए दोन्ही आरोपींच्या बँक खात्यांचीही चौकशी करत आहे, मात्र अटकेतील आरोपींना हवालाद्वारे पैसे पाठवत असल्याचे तपासात समोर आले आहे. एनआयएने काही हवाला व्यापाऱ्यांच्या साक्षीदारांचे जबाबही घेतले आहेत. दोन्ही आरोपींचे मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत. त्याचा सीडीआर काढण्यात आला आहे. मोबाईलमधील डिलीट केलेला डेटा परत मिळवण्यासाठी हे फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले जातील.

अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक आरिफ अबू बकर शेख अंडरवर्ल्डमध्ये आरिफ भाईजान म्हणून ओळखला जातो. तो छोटा शकीलचा नातेवाईक आहे. शकीलच्या बहिणीचे लग्न आरिफ भाईजानशी झाले आहे. तो शकीलसोबत अनेक वर्षे दुबई आणि पाकिस्तानमध्ये राहत होता. त्यामुळेच एनआयए दाऊद आणि शकीलचे सध्याचे ठिकाण त्याच्यामार्फत पाकिस्तानात शोधण्याचा प्रयत्न करत आहे.


गायीच्या शेणापासून सीएनजी बनवणार, गरज पडल्यास म्हशीचे शेण सुद्धा खरेदी करू… भाजप नेत्याचं अजब विधान