घरताज्या घडामोडीCovaxin : देशात ११ जणात एकालाच मिळाला कोवॅक्सिनचा डोस

Covaxin : देशात ११ जणात एकालाच मिळाला कोवॅक्सिनचा डोस

Subscribe

भारताच्या Covid-19 विरोधातील लढाईत देशी बनावटीच्या कोवॅक्सिनचा महत्वाचा वाटा आहे. आठ महिन्यांच्या कोरोना लसीकरणानंतरही ११ पैकी १ भारतीयालाच कोवॅक्सीनची लस मिळाली आहे. ज्या गतीने भारतात कोवॅक्सीनचे उत्पादन आवश्यक होते, त्यातुलनेत भारत बायोटेक कंपनी लसीकरण मोहिमेत अपयशी ठरली आहे. सातत्याने नियोजित टार्गेट पुर्ण करण्यात ही कंपनी अपयशी ठरली आहे. (Covaxin missed prodction target only 1 out of 11 got covaxin dose)

लस निर्मितीसाठी आवश्यक असणारा कच्चा माल आणि लस भरण्याची क्षमता नसल्यानेच अनेकदा कंपनीला लसनिर्मितीत अपयश आले आहे. त्यादरम्यानच कोवॅक्सिनच्या लशीच्या गुणवत्तेत अनेक समस्या आढळल्या आहेत. भारत बायोटेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्ण एल्ला यांनी कोरोना लशीच्या पुरवठ्यासाठी पुन्हा घोषणा केली आहे. कोवॅक्सिनने ऑक्टोबरपासून १० कोटी लशीची घोषणा केली होती. आता हा लसीचा पुरवठा ५.५ कोटी इतका करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. सध्या ३.५ कोटी लशींची निर्मिती केली जात आहे.

- Advertisement -

मे महिन्यात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ५५ कोटी कोवॅक्सीन लसीचे डोस पुरवठा करणार असल्याचे स्पष्ट केले होते. ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत १० कोटी यानुसार लसीचा पुरवठा करण्यात येईल असे केंद्राने स्पष्ट केले आहे. साधारणपणे २० टक्के म्हणजे आठ कोटी इतके टार्गेट कमी करण्यात आले आहे. तुलनेत ऑगस्ट आणि सप्टेंबर या कालावधीसाठी महिन्यापोटीचा लसपुरवठा हा कमी राहिला. त्यामुळेच कंपनीच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित झाला आहे. कंपनीने वर्तवलेला अंदाज आणि प्रत्यक्षात पुरवलेली लस यामध्ये मोठा फरक आढळून आला आहे. तुलनेत सीरमचा पुरवठा हा ९० टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात आहे. देशातील ९४ टक्के लोकसंख्येला लस पुरवण्यासाठी दिवसाला १ कोटी इतक्या मोठ्या प्रमाणात लस पुरवठा गरजेचा आहे. तेव्हाच ३१ डिसेंबरचे लक्ष्य गाठणे शक्य होईल. कोवॅक्सिनने आतापर्यंत लस पुरवठ्याच्या उदिष्टाच्या निमित्ताने कोणतीही स्पष्ट आकडेवारी दिलेली नाही.

भारत बायोटेकने सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात सध्याची लस निर्मितीची क्षमता ही ९० लाखांवरून महिन्यापोटी २ कोटी डोस इतकी वाढवणार असल्याचे भारत बायोटेकने स्पष्ट केले आहे. जुलैपासून भारत बायोटेककडून ५.५ कोटी लशीचे डोस मिळणे अपेक्षित होते. सरकारकडूनही अडीच कोटींच्या लस निर्मितीचे उदिष्ट हे ५.८ कोटी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते.

- Advertisement -

हेही वाचा – भारतात कोरोना लसीचे निर्मिती करा, मोदींचे ‘UNGA’मध्ये जगभरातील लस निर्मिती कंपन्यांना आवाहन

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -