घरCORONA UPDATECorona Lockdown: ड्युटी जॉईन करण्यासाठी पोलिसाने केली ४५० किमींची पायपीट

Corona Lockdown: ड्युटी जॉईन करण्यासाठी पोलिसाने केली ४५० किमींची पायपीट

Subscribe

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींनी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या होत्या. मात्र अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या आरोग्य आणि पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांना देखील अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. असाच एक प्रकार मध्य प्रदेशमध्ये घडला आहे. एका २२ वर्षीय शिपायाने २० तासांची पायपीट करुन ड्युटीवर हजर राहण्याचा विक्रम केला आहे. दिग्विजय शर्मा यांनी उत्तर प्रदेश येथील आपल्या घरापासून जवळपास ४५० किमींचा प्रवास करत मध्य प्रदेशमधील राजगढ गाठले. विशेष म्हणजे वरिष्ठांनी घरीच राहण्याचा सल्ला दिला असूनही दिग्विजय यांनी कर्तव्याला प्राथमिकता दिली.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये शर्माने सांगितले की, “माझी कला शाखेची परिक्षा १६ ते २३ मार्च दरम्यान होती. त्यासाठी मी सुट्टी घेऊन गावी गेलो होतो. मात्र लॉक डाऊनमुळे परिक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर मी माझ्या वरिष्ठांना फोन करुन ड्युटीवर परतण्यासंबंधी विचारणा केली. मात्र प्रवासाचे साधन नसल्यामुळे ड्युटीवर येऊ नको, असे त्यांनी मला सांगितले. तसेच माझ्या परिवाराने देखील मला घरीच राहण्याचा सल्ला दिला होता.”

- Advertisement -

आपल्या प्रवासाबद्दल सांगताना शर्मा म्हणाला की, “मी २५ मार्चच्या सकाळी पायीच प्रवासाला सुरुवात केली. वीस तासांच्या प्रवासात कधी पायी तर कधी मोटारसायकलची लिफ्ट घेत मी मजल दरमजल करत राजगढला शनिवारी रात्री पोहोचलो. त्यानंतर मी वरिष्ठांना मी ड्युटीवर रुजू होण्याबाबत सांगितले. मात्र त्यांनी मला आराम करण्याचा सल्ला दिला. कारण पायी चालून माझे पाय सुजले होते.”

cop walks 450 km

- Advertisement -

दिग्विजय शर्माच्या या समर्पण भावनेची वरिष्ठांनी देखील दखल घेतली. राजगढचे एसपी प्रदिप शर्मा यांनी आपल्या सहकाऱ्याचे कौतुक करणारे पत्र लिहिले. यामध्ये त्यांचे कौतुक करण्यात आले आहे. तसेच राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहून त्यांच्याकडूनही प्रशंसा व्हावी, यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे प्रदीप शर्मा यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -