घरदेश-विदेशकोरोनावर मात केलेल्या रूग्णांना झाला गॅंग्रीन; भारतातलं पहिलं प्रकरण

कोरोनावर मात केलेल्या रूग्णांना झाला गॅंग्रीन; भारतातलं पहिलं प्रकरण

Subscribe

देशात कोरोनाचा कहर अद्याप पुर्णतः संपलेला नाही. तर कोरोनावर मात केल्यानंतरही कोरोना रूग्णांना त्याचे दुष्परिणाम होत असल्याचे दिसून येत आहेत. कोरोनातून बरे झाल्यानंतर ५ रुग्णांच्या पित्ताशयात गॅंग्रीन दिसून आले. सर गंगा राम रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. या ५ रुग्णांवर जून ते ऑगस्ट दरम्यान यशस्वी उपचार देखील करण्यात आले आहेत. तर जून ते ऑगस्ट दरम्यान अशा ५ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून कोरोनामधून बरे झाल्यानंतर, या रुग्णांना पित्ताशयात खडे नसताना जळजळ होत होती आणि यामुळे त्यात गॅंग्रीन बनले. त्यामुळे आम्हाला त्यांचे त्वरित ऑपरेशन करण्याचा निर्णय घ्यावा लागाला, असे लिव्हर, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि पॅनक्रियाटोबिलरी सायन्सेसचे अध्यक्ष अनिल अरोरा यांनी सांगितले.

डॉक्टर अरोरा यांनी असेही सांगितले की, कोरोना संसर्गातून बरे झाल्यानंतर ही पहिलीच वेळ आहे, पित्ताशयात गॅंग्रीन म्हणजेच पित्ताशयाची रूग्णे नोंदवली गेली आहेत. या ५ रुग्णांपैकी ४ पुरुष आणि एक महिला आहेत आणि त्या सर्वांचे वय ३७ ते ७५ वर्षांच्या दरम्यान आहे. गँग्रीन हा एक आजार आहे ज्यामध्ये संक्रमणामुळे किंवा रक्त प्रवाह कमी झाल्यामुळे शरीराच्या ऊती नष्ट होऊ लागतात किंवा कित्येकदा शरीराचा एखादा भाग कापवा लागतो. या सर्व रुग्णांना ताप, ओटीपोटाच्या उजव्या बाजूला वेदना आणि उलट्या यासारखी लक्षणे जाणवत होती. त्यापैकी दोन मधुमेहाचे रुग्ण होते तर एकाला हृदयरोग होता. यापैकी तीन रुग्णांनी कोरोनाच्या उपचारासाठी स्टिरॉइड्स घेतले होते. या रोगाचे अल्ट्रासाऊंड आणि सीटी स्कॅनद्वारे निदान केले जाऊ शकते. या सर्व रुग्णांवर यशस्वीपणे लेप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया करण्यात आली.

- Advertisement -

पित्ताशयातील गॅंग्रीन कॅल्क्युलस पित्ताशयाचा दाह ही एक गंभीर स्थिती आहे ज्यामुळे मृत्यूची शक्यता ३० ते ६० टक्क्यांनी वाढते. हे सामान्यतः मधुमेह, एचआयव्ही संसर्ग, रक्तवहिन्यासंबंधी रोग, दीर्घकाळ उपासमार आणि सेप्सिस असलेल्या रुग्णांमध्ये दिसून येते असल्याचेही डॉ.अरोरा यांनी सांगितले.


 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -