घरमहाराष्ट्रदानवे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना सर्व सुरळीत होतं; राऊतांचा चंद्रकांत पाटलांना अप्रत्यक्ष टोला

दानवे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना सर्व सुरळीत होतं; राऊतांचा चंद्रकांत पाटलांना अप्रत्यक्ष टोला

Subscribe

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना सर्वकाही सुरळीत चालू होतं असं म्हणत शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. चंद्रकांत पाटील आणि संजय राऊत यांच्यात गेले काही दिवस कलगीतुरा सुरु आहे. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाही आहेत.

चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात, असा टोला लगावला होता. यावर राऊत यांनी पलटवार करताना कुणाला माहीत नसताना पाटील मंत्री होऊ शकतात तर मी का नाही मोठ्या पदावर जाऊ शकत, असा टोला लगावला आहे. तसंच, रावसाहेब दानवे यांचं कौतुक करताना चंद्रकांत पाटलांना लक्ष्य केलं. दानवे जेव्हा महाराष्ट्रात भाजपचे अध्यक्ष होते. तेव्हा सर्व काही सुरळीत सुरू होतं, असं राऊत म्हणाले.

- Advertisement -

दानवे सर्वांचे मित्र

मुख्यमंत्र्यांनी दानवेंना भेटायला बोलावलं आहे. ते केंद्रीय मंत्री आहेत. मीही त्यांना अनेकदा भेटतो. ते अजातशत्रू आहेत. दानवे सर्वांचे मित्र आहेत. दानवे जेव्हा महाराष्ट्रात भाजपचे अध्यक्ष होते. तेव्हा सर्व काही सुरळीत सुरू होतं, तेही खरं आहे. तसंच, त्यांना बोलावलं असेल तर चांगलं आहे. ते रेल्वे राज्यमंत्री आहेत. रेल्वेचे अनेक प्रश्न आहेत. मुंबईचे प्रश्न आहेत. राज्याचे प्रश्न आहेत. त्यावर चर्चा होईल. केंद्रीय मंत्रिमंडळाशी कोणत्याही राज्याचा संवाद राहणं महत्त्वाचं आहे, असं राऊत म्हणाले.

चंद्रकांत पाटलांना नागालँडची ऑफर

चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसात बदल होणा असल्याचे संकेत दिले होते. चंद्रकांत पाटलांच्या यया वक्तव्याची राऊतांनी खिल्ली उडवली आहे. त्या दोन दिवसातील २४ तास संपले असून आता २४ तास राहिले आहेत. वाट पाहा. ते काय भूकंप करतात ते पाहा. चंद्रकांत पाटील महाविकास आघाडीत सामिल होऊ शकतात असं मुख्यमंत्र्यांच्या विधानवरून वाटतंय. तीन पैकी एका पक्षात प्रवेश करू असं पाटील यांना वाटत असेल, म्हणून त्यांना माजी राहणार नाही असं म्हटलं असावं. मुख्यमंत्र्यांनीही पाटील तीन पैकी एका पक्षात प्रवेश करतील असं सांगितलं आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे ते राज्यपाल म्हणून नागालँडमध्ये जाणार आहेत. त्यांच्या अस्वस्थ मनामुळे त्यांना नागालँडच्या राज्यपालपदाची ऑफर दिली आहे, असा चिमटा राऊत यांनी काढला.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -