घरताज्या घडामोडीकोरोना चाचणीला पर्याय आता 'कोविड अलार्म': तुमच्या आजूबाजूला कोरोनाग्रस्त असेल तर करणार...

कोरोना चाचणीला पर्याय आता ‘कोविड अलार्म’: तुमच्या आजूबाजूला कोरोनाग्रस्त असेल तर करणार अलर्ट

Subscribe

जगभरात अजूनही कोरोना प्रादुर्भाव कायम आहेत. सुरुवातीपासून कोरोना रुग्णाची ओळख पटविण्यासाठी अनेक वेगवेगळ्या चाचण्या केल्या जात आहे. कधी आरटी-पीसीआर तर कधी अँटिजेन टेस्ट केली जातेय. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाचण्या करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पण आता कोरोनाबाधितांची ओळख पटविण्याचा हा एकच मार्ग राहिला नाही आहे. ब्रिटिश वैज्ञानिकांनी एक कोविड अलार्म विकसित केला आहे. ज्याद्वारे कोणत्याही खोलीतील उपस्थित असलेल्या व्यक्तीपैकी कोणता व्यक्ती कोरोनाबाधित आहे, ते अवघ्या १५ मिनिटांत समजते.

द संडे टाईम्स दिलेल्या वृत्तानुसार, कोरोनाबाधितांची माहिती देणारे हे उपकरणं येत्या काळात विमानाच्या केबिन, शाळा, केअर सेंटर, घर आणि कार्यालयामध्ये स्क्रिनिंगसाठी बसवता येईल. या उपकरणाचा आकार स्मोक अलार्म एवढा मोठा आहे. लंडनमधील स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिन आणि डरहम युनिव्हर्सिटीचे वैज्ञानिकांनी केलेले संशोधनाचे प्राथमिक अहवाल आशादायी आहे. या उपकरणातील परिणामाची अचूकता पातळी ९८ ते १०० टक्क्यांपर्यंत प्रभावी आहे. कोरोना चाचणी आणि अँटीजेन टेस्टच्या तुलनेत कोरोनाबाधित ओळख पटविण्यास कोविड अलार्म जास्त प्रभावी आहे.

- Advertisement -

वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हे परिणाम सुरुवातीच्या अहवालातील आहेत. याचा अभ्यास एका पेपरमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. ज्याचे पुनरावलोकन होणे बाकी आहे. केंब्रिजशायरमधील फर्म रोबो साइंटिफिकद्वारे विकसित करण्यात आलेला हा कोविड सेंसर त्वचेतून निर्माण झालेल्या रसायनला शोधून कोरोनाबाधिताची ओळख पटवतो. तसेच कोरोनाबाधित लोकांच्या श्वासमध्ये असलेल्या रसायनांचे परीक्षण करून एखादा व्यक्ती कोरोनाबाधित आहे की नाही याचा निकाल देतो. शिवाय मानवी नाकाच्या माध्यमातून ओळखत असलेल्या सूक्ष्म वासालाही हा सेन्सर ओळखू शकतो.

कोविड अलार्मचे संशोधन करणाऱ्या टीमच्या अभ्यासात असा खुलासा झाला आहे की, फक्त कुत्रे हा सूक्ष्म जीव ओळखू शकतात, पण हा कोविड अलार्म अधिक अचूक माहिती देता, असा दावा करण्यात आला आहे. जरी व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नसली तरी देखील कोविड अलार्म अधिक प्रभावीपणे काम करते.

- Advertisement -

हेही वाचा – Corona Vaccination: अमेरिकेत ८९९ लोकांना दिले एक्सपायर झालेल्या लसीचे डोस


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -