घरCORONA UPDATEकोरोनावर औषध तयार करणारी कंपनी झाली मालामाल

कोरोनावर औषध तयार करणारी कंपनी झाली मालामाल

Subscribe

जगभरात कहर करणाऱ्या कोरोनावर अद्याप औषध आलेलं नाही. मात्र, केंद्र सरकारने काही कंपन्यांच्या जेनरिक औषधांना मान्यता दिली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर, ग्लेनमार्क या फार्मा कंपनीच्या प्रयत्नांना यश आलं आहे. ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सचे औषध कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी वापरलं जाणार आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना आता ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सचं औषध दिलं जाणार आहे. त्याचे अपेक्षित पडसाद आज शेअर बाजारात उमटले. या औषधाने कंपनीची व्यावसायिक वृद्धी होणार असल्याने गुंतवणूकदारांनी आज बाजारात ग्लेनमार्कच्या शेअरची जोरदार खरेदी केली. सध्या ग्लेनमार्कचा शेअर ४० टक्क्यांनी वधारला होता. त्यामुळे गुंतवणूकदार आणि कंपनी मालामाल झाले आहेत.

मुंबई शेअर बाजारात सध्या ग्लेनमार्कचा शेअर ३२ टक्क्यांनी वधारून ५४१ रूपये झाला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजारात ३२ टक्क्यांनी वधारून ५४० रुपये झाला आहे. आज दिवसभरात या शेअरने ५७३ रुपयांची मजल मारली. ग्लेनमार्क फार्मास्युटिक्ल्सने करोनावर औषध आणलं आहे. या अँटीव्हायरल औषधाचं नाव फेविपिरावीर असं आहे. डीजीसीआईने या औषधाच्या उत्पादनाला आणि विक्रीला परवानगी दिली आहे, अशी माहिती कंपनीने दिली, यामुळे गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. यामुळे सोमवारी ग्लेनमार्कच्या शेअर्समध्ये एकतर्फी वाढ झाली.

- Advertisement -

हेही वाचा – राहुल गांधींच्या चुका झाकायला मनमोहन सिंग यांनी पत्र लिहिलं – देवेंद्र फडणवीस


ग्लेनमार्क फार्मा ही औषध निर्माण क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. मागील सहा महिन्यांपासून जगभरात करोना विषाणूवर लस तयार करण्यासाठी संशोधन सुरू आहे. मात्र अद्याप कुणालाही त्यात यश आलेलं नव्हतं. अमेरिकेतील काही कंपन्यांकडून वेगाने संशोधन सुरू आहे. मात्र, ग्लेनमार्क अथक प्रयत्नांनंतर ग्लेनमार्क फार्मानं कोरोनाची सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी औषध आणलं आहे. एका गोळीची किंमत ही १०३ रुपये इतकी आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -