घरताज्या घडामोडीLive Update: API रियाज काझी आणि इतर सहकारी यांच्याकडे चौकशी करून सोडण्यात...

Live Update: API रियाज काझी आणि इतर सहकारी यांच्याकडे चौकशी करून सोडण्यात आले

Subscribe

एनआयएने चौकशीसाठी बोलवण्यात आलेल्या सीआययूचे एपीआय रियाज काझी आणि इतर सहकारी यांच्याकडे चौकशी करून सोडण्यात आले आहे.


लातूर जिल्ह्यात नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. संध्याकाळी ८ वाजल्यापासून ते सकाळी ५ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लातूरमध्ये असणार आहे. आठवडा बाजार ३१ मार्चपर्यंत बंद असणार आहे. आपात्कालीन सेवांना सूट देण्यात आली आहे.

- Advertisement -


सचिन वाझेंना एका दिवसाची न्यायालयीन कोठडी

- Advertisement -

सचिन वाझेंना २५ मार्च पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मुकेश अंबानी स्फोटक प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली. शनिवारी रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी त्यांना अटक करण्यात आली.  एनआयए / एमएमआय कलम कलम २८६, ४६५, ४७३, ५०६(२), १२० बी अंतर्गत आयपीसी आणि ४ (a) (b) (I) स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ अंतर्गत अटक करण्यात आली आहे.


सचिन वाझेंची NIA स्पेशल कोर्टात सुनावणी सुरु

सचिन वाझेंची NIA कोर्टात सुनावणी सुरु झाली आहे. सचिन वाझे NIA च्या स्पेशल हॉलिडे कोर्टोत हजर करण्यात आले आहे.


सचिन वाझे NIA कोर्टात दाखल

मुकेश अंबानी स्फोटक प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे NIA च्या स्पेशल हॉलिडे कोर्टोत दाखल झाले आहेत. वाझे यांना शनिवारी रात्री अटक करण्यात आली.


सचिन वाझे कोर्टाच्या दिशेने रवाना

मुकेश अंबानी स्फोटक प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी शनिवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. सचिन वाझेंना रविवारी NIA च्या स्पेशल हॉलिडे कोर्टोत हजर केले जाणार आहे. कोर्टात हजर राहण्यासाठी सचिन वाझे रवाना झाले आहेत.


सचिन वाझे यांची प्रकृती खालावली

पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची प्रकृती खालावली आहे. सकाळी त्यांना सलायन चढवण्यात आले होते. रविवारी दुपारी वाझे यांनी कोर्टात हजर केले जाणार आहे. त्यापूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी मुंबईच्या जे जे रुग्णालयात येण्यात आले होते. मुकेश अंबानी स्फोटक प्रकरणात शनिवारी रात्री उशिरा वाझे यांनी NIA कडून अटक करण्यात आली.


क्राईम इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांना NIA ने चौकशीसाठी बोलावले

क्राईम इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांना NIA ने चौकशीसाठी बोलावले आहे. मुकेश अंबानी आणि मनसुख हिरेन प्रकरणी वाझेंसोबत कसून चौकशी करण्यात येणार आहे.


सचिन वाझेंच्या घराला १०-१२ दिवसांपासून कुलूप

मुकेश अंबानी प्रकरणात अटक करण्यात आलेले पोलीस अधिकारी सचिन वाझेंच्या घराला कुलूप असल्याची माहिती मिळत आहे. वाझे कुटुंबिय १० ते २१ दिवसांपासून घरी नाही. वाझे हे ठाण्यात राहत असलेल्या साकेत सोसायटीच्या सिक्युरिटीने ही माहिती दिली आहे.


सचिन वाझेंच्या अटकेनंतर गृहमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

सचिन वाझेंच्या अटकेनंतर गृहमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. NIA आणि ATS कडून दोन्ही प्रकरणाची चौकशी सुरु आहे. सचिन वाझे प्रकरणाच्या तपासात जी माहिती समोर येईल, त्यावरुन केंद्र आणि राज्य सरकार योग्य कारवाई करेल असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे.


सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात सीबीआयने काय केले याचे विरोधकांनी उत्तर द्यावे – संजय राऊत


केंद्रीय यंत्रणेला राज्यात घूसवून मुंबई पोलिसांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न – संजय राऊत


मुंबई पोलीसांची क्षमता जगाला माहिती आहे. मुंबई पोलिसांच्या क्षमतेवर हल्ला करण्याचा प्रयत्न – संजय राऊत


सचिन वाझेंची जे जे रुग्णालयात केली वैद्यकीय चाचणी

सचिन वाझेंना शनिवारी रात्री मुकेश अंबानी प्रकरणात अटक करण्यात आली. रविवारी दुपारी त्यांनी कोर्टात हजर केले जाणार आहे. त्याआधी त्यांची सचिन वाझेंची जे जे रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे.


अर्णब गोस्वामीच्या अटकेसाठी वापरली होती वाझेंनी तीच स्कॉर्पिओ

अर्णब गोस्वामीच्या अटकेसाठी वापरण्यात आलेल्या स्कॉर्पिओ कार सारखी हुबेहुब कार अंबानीच्या घराबाहेरही होती. त्यामुळे आता अर्णब गोस्वामीच्या अटकेसाठी वापरण्यात आलेली स्कॉर्पिओ कार सचिव वाझेंनी वापरली का? असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.


सचिन वाझेंची सायन रुग्णालयात होणार कोरोना चाचणी

मुकेश अंबानी स्फोटक प्रकरणी सचिन वाझेंना शनिवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. सचिन वाझेंना आज दुपारी कोर्टांत हजर केले जाणार आहे. सचिन वाझेंची सायन रुग्णालयात कोरोना चाचणी केली जाणार आहे. तर जे जे रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.


मुकेश अंबानी प्रकरणात वाझेंसह ५-६ जणांचा सहभाग – NIA

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या गाडी प्रकणात ,सचिन वाझे यांच्या सह ५-६ जणांचा सहभाग असल्याचा संशय NIA ला असल्याचे समजते. या संदर्भात मुंबई पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.


सचिन वाझेंना आज ११ वाजता कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता

मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटकं आढळल्या प्रकरणी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी वाझे यांना अटक केल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अटकेपूर्वी तब्बल १३ तास सचिन वाझे यांची एनआयएकडून चौकशी करण्यात आली. या १३ तासांच्या चौकशीअखेरीस एनआयएने त्यांना अटक केली. रविवारी आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्यांना कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे.


सचिन वाझे यांना अखेर अटक

पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अखेर अटक करण्यात आली आहे. मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) ही कारवाई केली आहे. एनआयएने सचिन वाझे यांची शनिवारी दिवसभर कसून चौकशी केली. त्यानंतर रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी त्यांना अटक केली आहे. एनआयए / एमएमआय कलम कलम २८६, ४६५, ४७३, ५०६(२), १२० बी अंतर्गत आयपीसी आणि ४ (a) (b) (I) स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ अंतर्गत अटक करण्यात आली आहे.


अर्णब गोस्वामी याला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या ताफ्यात असलेली एक स्कॉर्पिओ हुबेहूब मुकेश अंबानी यांच्या आलिशान घराजवळ आढळलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ मोटारी सारखी आहे. ज्या वेळी सचिन वाझे अर्णब गोस्वामी रायगड पोलिसांसोबत अर्णबला अटक करण्यासाठी गेले होते, त्यावेळी मनसुख हिरेन यांची स्कॉर्पिओ मोटार त्यांच्या ताब्यात होती का? असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास देखील राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयए करणार आहे. यामुळे सचिन वाझे यांच्या अडचणीत आणखी भर पडणार असल्याची शक्यता आहे. या स्कॉर्पिओची नंबर प्लेट देखील बनावट असून एका मोटरसायकलचा नंबर या स्कॉर्पिओला लावण्यात आला आहे, एनआयए तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास करणारे एटीएसचे पथक देखील याचा तपास करीत आहे.


मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणातही वाझे यांचा सहभाग आहे का?

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटालिया या आलिशान घराजवळ स्फोटके ठेवलेली स्कॉर्पियो मध्ये मुख्य सहभाग आणि मुख्य भूमिका बजावणाऱ्या सहसहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांना एनआयएकडून शनिवारी रात्री अटक करण्यात आली आहे. वाझेंच्या अटेकमुळे पोलीस दलात खळबळ माजली असून आता मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणातही वाझे यांचा सहभाग आहे का?याबाबत एनआयए पुढील तपास करण्याची शक्यता आहे.


वाझेंच्या अकटेनंतर मुंबई पोलिसातील बड्या अधिकाऱ्यांच्या चौकशीची शक्यता

एनआयए मुंबई पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना आज कोर्टासमोर हजर करणार आहे. मुंबई पोलिस आयुक्तालयात आॅन ड्युटी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिस दलातील आणखी काही बड्या अधिका-यांच्या चौकशीची शक्यता


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -