घरताज्या घडामोडीLive Update: राज्यात ३ हजार १८ नवे रुग्ण, ६८ जणांचा मृत्यू

Live Update: राज्यात ३ हजार १८ नवे रुग्ण, ६८ जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यात ३ हजार १८ नवे रुग्ण, ६८ जणांचा मृत्यू

राज्यात ३ हजार ०१८ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १९ लाख २५ हजार ०६६ झाली आहे. राज्यात ५४ हजार ५३७ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ६८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४ हजार ३७३ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५६ टक्के एवढा आहे. (सविस्तर वाचा )

- Advertisement -

मुंबईतील शाळा १५ जानेवारी पर्यंत बंद ठेवण्याचा पालिकेचा निर्णय

मुंबईतील शाळा १५ जानेवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महानरगपालिकेने घेतला आहे.

- Advertisement -

 

हिंगणा MIDC मधील कारखान्याला आग लागल्याचे समोर आले आहे. येथील फर्निचर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली आहे. या ठिकाणी लाकडाचा मोठा साठा असल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


ब्रिटनहून भारतात आलेले ६ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे.


देशात गेल्या २४ तासांत १६ हजार ४३२ नवे कोरोनाबाधित आढळले असून २५२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच २४ हजार ९०० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी २ लाख २४ हजार ३०३वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ४८ हजार १५३ जणांचा मृत्यू झाला असून ९८ लाख ७ हजार ५६९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच सध्या देशात २ लाख ६८ हजार ५८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


२८ डिसेंबरपर्यंत देशात १६ कोटी ९८ लाख १ हजार ७४९ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या असून यापैकी आतापर्यंत ९ लाख ८३ हजार ६९५ नमुन्यांच्या चाचण्याचा काल (सोमवारी) दिवसभरात झाल्या आहेत, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.


आंगणेवाडी, श्री. देवी भराडीमातेचा वार्षिकोत्सव दिनांक ६ मार्च २०२१ शनिवार रोजी संपन्न होणार आहे. तरीही देशात चालू असलेल्या महामारीच्या पार्श्वभूमीवर होणारा वार्षिकोत्सव हा फक्त आंगणेकुटुंबिय आंगणे वाडी यांच्या उपस्थितीत मर्यादित स्वरुपात संपन्न करण्यात येईल. भाविकांच्या होणाऱ्या गैरसोय बद्दल आम्ही दिलगीर आहोत. भाविकांना नम्र विनंती आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणाहून श्री. देवी भराडी मातेस आपलं सांगण सांगावं, आई भराडी माता आपल्या इच्छा नक्कीच पूर्ण करे, असे आंगणे कुटुंबिय, आंगणेवाडीकडून सांगण्यात आले आहे.


महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची बैठक संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहात होणार आहे. तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत मविआतील मतभेदावर, महामंडळाच्या नियुक्त्यांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.


जगातील अनेक देशांमध्ये आता कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जगातील कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगातील कोरोनाबाधितांचा संख्या ८ कोटी १६ लाख ६७ हजारांहून अधिक झाली आहे. यापैकी आतापर्यंत १७ लाख ८१ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून ५ कोटी ७७ लाख ९३ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -