घरमहाराष्ट्रवर्षा राऊत यांना ED मार्फत ५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

वर्षा राऊत यांना ED मार्फत ५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

Subscribe

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) पीएमसी बँक गैरव्यवहारप्रकरणी नोटीस पाठवून २९ डिसेंबरला म्हणजेच आज चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी ईडीकडे ५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ मागितली आहे. पीएमसी बँक गैरव्यवहारप्रकरणी याआधी देखील दोन वेळेस ईडीने नोटीस पाठवली होती. मात्र, वर्षा राऊत यांनी तब्येतीचं कारण सांगत चौकशीला गेल्या नसल्याचं सुत्रांनी सांगितलं. मंगळवारी सायंकाळी वर्षा राऊत यांना ५ जानेवारीपर्यंत हजर राहण्याचे नवीन समन्स बजावले आहेत, असे वृत्त ईडी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. तर प्रवीण राऊत आणि त्यांच्या पत्नी हे दोघेही इडीच्या चौकशीला सामोरे गेले आहेत.

ईडीने वर्षा राऊत यांना २९ डिसेंबर म्हणजेच आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. परंतु वकिलांशी सल्लामसलत करण्यासाठी त्यांनी ५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ मागितल्याचं कळतं. तसं पत्रही त्यांनी ईडीसमोर सादर केलं आहे. यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलतानाही राऊत यांनी वृत्ताला दुजोरा दिला. दरम्यान ईडीने वर्षा राऊत यांच्या पत्राला अद्याप कोणतंही उत्तर दिलेलं नाही.

- Advertisement -

काय आहे प्रकरण?

वर्षा राऊतांना आलेली ईडीची नोटीस ही पीएमसी बँकेतील ५५ लाख रुपयांच्या व्यवहाराप्रकरणी आहे. यासंबंधी ईडीला वर्षा राऊत यांची चौकशी करायची आहे. वर्षा राऊत यांच्या पीएमसी बँक खात्यामधून काही आर्थिक व्यवहार झाले होते. हे सर्व प्रकरण एचडीआयएल या कंपनीशी संबंधित असल्याचा संशय ईडीला आहे. पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं एचडीआयएलच्या सारंग वाधवान आणि राकेश वाधवान यांना अटक केली होती.

वाधवान कुटुंबाने या बँकेकडून हजारो कोटी रुपयांचं कर्ज काढलं होतं आणि त्याची परतफेड केली नाही. या वाधवा कुटुंबाच्या जवळचे असणारे प्रवीण राऊत हे संजय राऊताच्या खास मित्रांपैकी एक असल्याचं सांगण्यात येतंय. प्रवीण राऊतांची पत्नी माधुरी यांच्या अकाउंटवरुन ५५ लाख रुपये संजय राऊतांच्या पत्नीच्या अकाउंटवर ट्रान्सफर करण्यात आले होते. हा पैसा का ट्रान्सफर करण्यात आला याची माहिती ईडीला हवी आहे. यासाठी ईडीने त्यांना नोटीस पोठवली असल्याचं समजतंय.

- Advertisement -

हेही वाचा – मला धमकावणार अजून जन्माला आलेला नाही – संजय राऊत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -