घरCORONA UPDATECT Scan म्हणजे ३०० चेस्ट X-Ray च्या बरोबरीचा, Corona सौम्य लक्षणांच्या रूग्णांकडून...

CT Scan म्हणजे ३०० चेस्ट X-Ray च्या बरोबरीचा, Corona सौम्य लक्षणांच्या रूग्णांकडून दुरूपयोग AIIMS च्या डॉ गुलेरियांचे मत

Subscribe

सिटी स्कॅनचा वापर विचार करुन करा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक नवीन गोष्टी समोर येत आहेत. कोरोनाच्या म्युटेशनमुळे अनेक नवीन लक्षणेही समोर आली आहेत. कोरोनाचे निदान करण्यासाठी आपल्याकडे अँन्टीजेन टेस्ट (Antigen test) आणि RT-PCR टेस्ट केली जाते. त्यातही RT-PCR टेस्ट सर्वांत योग्य समजली जाते. मात्र बऱ्याचदा RT-PCR टेस्ट करुनही कोरोनाचे निदान होत नसल्याचे अनेक प्रकार समोर आले आहे. त्यामुळे रुग्णांना सिटी स्कॅन(CT-SCAN) करावे लागते. दिल्लीच्या एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी याबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे. स्वास्थ मंत्रालयाच्या झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सिटी स्कॅनचा वापर विचार करुन करा. CT Scan म्हणजे ३०० चेस्ट X-Ray च्या बरोबरीचा आहे, असे त्यांनी सांगितले.


आपल्याकडे अनेक वेळा होम आयसोलेशनमध्ये असणारे रुग्ण आपल्या डॉक्टरांना फोन करतात.  जर रुग्णाचा सॅचुरेशन ९३ किंवा त्याहून कमी असेल, त्याचप्रमाणे छातीत दुखत असेल तर त्यावेळीस डॉक्टरांना फोन करा. बऱ्याचदा सौम्य लक्षणे असणारे रुग्ण RT-PCR टेस्ट मधून कोरोनाचे निदान न झाल्यास रुग्ण डॉक्टरांचा सल्ला घेऊन CT- SCAN करतात. कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांकडून CT -SCANचा दुरूपयोग केला जात असल्याचे डॉ. गुलेरीया यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

स्वास्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशाचा रिकव्हरी रेट वाढत आहे. २ मे पर्यंत ७८ टक्के इतका होता. आज रिकव्हरी रेट हा ८२ टक्के इतका आहे. आंध्र प्रदेश, आसाम,बिहार,चंदीगड,हरियाणा, कर्नाटक,केरळ,हिमाचल प्रदेश,मणिपुर आणि मेघालय या राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.


हेही वाचा – NEET-PGच्या परीक्षा चार महिने पुढे ढकलल्या

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -