घरताज्या घडामोडीCyclone Tauktae Live Updates: ११ तासानंतर मुंबई विमानतळावरील विमान सेवा सुरु

Cyclone Tauktae Live Updates: ११ तासानंतर मुंबई विमानतळावरील विमान सेवा सुरु

Subscribe

११ तासानंतर मुंबई विमानतळावरील विमान सेवा सुरु


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तौक्ते चक्रीवादळ परिस्थिती संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बातचित केली.

- Advertisement -

मुंबई विमानतळ रात्री ८ पर्यंत बंद राहणार


मुंबईत कमाल ताशी १०८ कमी वेगाने वाऱ्याची नोंद

- Advertisement -

वादळाचा धोका कमी, जिल्ह्यांनी मदत कार्य वेगाने सुरु ठेवावे – मुख्यमंत्री


तौक्ते चक्रीवादळ रात्री ८ दरम्यान गुजरातला धडकणार


मुंबईत अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली


राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागासोबत मुख्यमंत्र्यांची बैठक सुरू


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तोक्ते चक्रीवादळ परिस्थिती संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बातचित केली.


तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती रायगड जिल्हा प्रशासनाने केली जाहीर

रायगड जिल्ह्यातील आज सकाळी ११.०० वाजेपर्यंत झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे. एकूण २३.४२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून १ हजार १०४ घरांचे अंशत: नुकसान, १ घराचे पूर्ण नुकसान, एका व्यक्तीचा मृत्यू व दोन व्यक्ती जखमी त्याचबरोबर एका प्राण्याचाही मृत्यू. एकूण २ हजार २९९ कुटुंबांचे मिळून एकूण ८ हजार ३८३ व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.


‘तोत्के’ या चक्रीवादळाच्‍या प्रभावामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात वेगवान वारे वाहत असून पाऊस देखील सुरू आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी महानगरपालिका मुख्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षास भेट देऊन मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेतला. त्याचबरोबर या अनुषंगाने महानगरपालिकेद्वारे केलेल्या विविधस्तरीय नियोजनाच्या अंमलबजावणीचा आढावाही त्यांनी घेतला. यावेळेस अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी तसेच सहआयुक्त चंद्रशेखर चोरे (महानगरपालिका आयुक्त कार्यालय), उपायुक्त (आपत्ती व्यवस्थापन)  प्रभात रहांगदळे हे देखील उपस्थित होते.


मुंबईत पुढील काही तास सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा आय़एमडीकडून देण्यात आला आहे. १२० किमी प्रतिसार वेगाने वारा वाढेल, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.


तौक्ते चक्रीवादळ व पावसाची सुरु असलेली सततधार लक्षात घेता, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज वरळी सी फेस येथे पाहणी व आढावा घेतला. तसेच मुंबईकर नागरिकांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये असे आवाहन केले.


तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील समुद्र खवळलेला असून आज समुद्रात भरती ओहोटीच्या वेळा व लाटांची उंची खालील प्रमाणे-

भरती :- दुपारी ३.४४ वा.
उंची :- ३.९४ मीटर

ओहोटी :- रात्री ९:४२ वा.
उंची :- २.१९ मीटर


तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिव तसेच मदत व पुनर्वसन सचिवांकडून सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेतला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्य़ातील १२ हजार ४२० नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यात आले आहे अशी माहिती यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. आज दुपारी मुख्यमंत्री राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बैठकीतही आढावा घेणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील ३ हजार ८९६ ,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १४४ आणि रायगड जिल्ह्यातील ८ हजार ३८० लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे, मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांच्या बचाव व मदतकार्यासाठी संबंधित जिल्हा व राज्य प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे.


तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस ही कोसळत आहे. त्यामुळे मुंबईत काही भागात पाणी साठलं आहे

मालाड पूर्वेकडील पुष्पा पार्क येथील उत्तर-दिशेची रहदारी वादळाच्या पार्श्वभूमीवर कमी


चक्रीवादळाच्या सतर्कतेमुळे, मुंबई विमानतळ ११ मे पासून १७ मे दरम्यान १४ तास बंद ठेवणे आवश्यक- एमआयएएल


#CycloneTauktae #Update सकाळी ११ वाजता तौक्ते चक्रीवादळाची स्थिती


तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईत वाऱ्याचा वेग वाढल्याने BKC मध्ये असलेल्या कोव्हिड सेंटरला त्याचा मोठा फटका बसला आहे


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळ मुंबईच्या जवळ येताच वाऱ्याचा वेग वाढेल. कृपया समुद्र किनाऱ्याजवळ जाऊ नका. घरीच रहा, सुरक्षित रहा, BMC चे नागरिकांना आवाहन

तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर वांद्रे-वरळी सीलिंक सेवा काही काळासाठी बंद. कृपया बाहेर जाण्याचा विचार करत असल्यास पर्यायी मार्गाची निवड करा – BMC


तौक्ते चक्रीवादळाविरूद्ध सावधगिरीचा उपाय म्हणून मुंबई मोनोरेलची सर्व सेवा एका दिवसासाठी स्थगित


वडाळा उद्योग भवन येथे झाडं कोसळ्याने या मार्गावरील वाहतूक खोळंबली


वीर एसएच रोड, कालाचौकी पोलिस स्टेशन मुंबई येथे झाडं कोसळ्याने वाहतूकीत अडथळा


मुंबईत कालपासून सकाळी सात वाजेपर्यंत मुंबई शहरात ८.३७ मिमी, पूर्व उपनगरात ६.५३ मिमी, पश्चिम उपनगरात ३.९२ मिमी इतक्या पावसाची सरासरी नोंद करण्यात आली. तर या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जोरदार वाऱ्याने मुंबई शहरात ११, पूर्व उपनगरात १७, पश्चिम उपनगरात ६ झाडं आणि झाडांच्या फांद्या कोसळल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.


रायगड, पालघर, मुंबई, ठाणे आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत येत्या ३ तासांत वादळी वाऱ्यासह -९० ते १०० किमी प्रति ताशीच्या वेगाने पाऊस पडण्याची शक्यता आहे. -IMD मुंबई


तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या चौपाट्यांवर NDRF ची पथकं दाखल


गुजरातच्या सौराष्ट्र भागात ४.५ रिश्टर स्केलच्या तीव्रतेने भूकंपाचे धक्के

सोमवारी पहाटे गुजरातच्या सौराष्ट्र भागात ४.५ रिश्टर स्केलच्या तीव्रतेने भूकंपाचे धक्के बसले. राज्यातील उना आणि राजुला भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. सोमवारी पहाटे ३.३७ वाजता उनाच्या पूर्वेस साडेतीन किमीच्या खोलीवर हा भूकंप झाला असल्याचे नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने सांगितले.


तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारी राहणाऱ्या आतापर्यंत ७ हजार ८६६ नागरिकांचे स्थलांतरण पूर्ण झाले आहे.  अलिबाग-६०५, पेण-१९३, मुरुड-१०६७, पनवेल-१८६ उरण-४५१, कर्जत-४५, खालापूर-१७६, माणगाव- १३०९, रोहा- ५२३, सुधागड-१६५, तळा- १३५, महाड-१०८०, पोलादपूर- २९५, म्हसळा- ४९६, श्रीवर्धन- ११५८ या एकूण ७, ८६६ लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. तर रविवारी तौक्ते चक्रीवादळ सध्या सिंधुदुर्गाच्या मालवण किनारपट्टीजवळ असल्याने चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन देखील सतर्कता दाखवत जिल्हा प्रशासनाने किनारपट्टीरील ६८ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं होतं.


तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. त्याचसोबत मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन केलं जात आहे. मुंबईतील खार-दांडा कोळीवाड्यातील १५० मच्छिमारांच्या बोटी समुद्रातून परतल्या आहेत. चक्रीवादळामुळे समुद्र खवळलेला असेल, त्यामुळे कोळीवाड्यातील लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी महापालिकेकडून कोळीवाड्यातील लोकांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.


केरळ, गोवापाठोपाठ सिंधुदुर्ग, रत्नागिरीत रौदरुप धारण केलेल्या तौत्के चक्रीवादळाचा मुंबईच्या दिशेने प्रवास सुरु झाला आहे. या चक्रीवादळाचा मुंबईला कोणताही धोका नसला तरी हवामान विभागानं मुंबई व परिसराला ऑरेज अलर्ट जारी केला आहे. मुंबईत काल रात्रीपासूनच जोरदार वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. तसेच मध्यरात्रीपासूनच मुंबईत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसास सुरूवात


रायगड जिल्ह्यात काही भागात पावसाची रिपरिप सुरू झाली असून उरण, पनवेल, पेण परिसरात पावसाची रिपरिप सुरू झाल्याचं दिसून येतंय. रात्रीच्या सुमारास श्रीवर्धन, म्हसळा परिसरात जोरदार वारा सुटला होता. तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ७ हजार ८६६ रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.


तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जोरदार हवेसह पावसाची मध्यरात्रीपासून सुरूवात. जोरदार हवेने कित्येक झाडं कोसळली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -