घरदेश-विदेशTauktae Cyclone : उत्तरेच्या दिशेने २४ तासात वेगाने सरकणार चक्रीवादळ, १७ मे...

Tauktae Cyclone : उत्तरेच्या दिशेने २४ तासात वेगाने सरकणार चक्रीवादळ, १७ मे रोजी गुजरातला धडकणार

Subscribe

अरबी समुद्राच्या नैऋत्य भागात अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव वाढत आहे. या क्षेत्रात आणि लक्षद्वीपच्या भागात तौक्ते चक्रीवादळ धडकण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. येत्या २४ तासांत तौक्ते चक्रीवादळात आणखी तीव्रता येण्याची शक्यता आहे. १७ मे रोजी सकाळी उत्तर-वायव्य दिशेने हे वादळ वेगाने सरकणार असून ते गुजरातला धडकणार असल्याचे सांगितले जात आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, या कालावधीत सोसाट्याचा वारा सुटणार असून कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. लक्षद्वीपजवळ निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्राकडे सरकला असल्याने येत्या बारा तासांत चक्रीवादळसदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. हे चक्रीवादळ मंगळवारपर्यंत गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याचही संकेत असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

तौक्ते चक्रीवादळामुळे लक्षद्वीप बेटसमूह, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक किनारपट्टी आणि त्यालगतचा भाग, दक्षिण कोकण आणि गोवा, गुजरात या भागांत मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय समुद्रात उंच लाटा उसळणार असल्याचंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. असे सांगितले जात आहे की, सोमवारी १७ मे रोजी गुजरातमध्ये तौक्ते गंभीर स्वरुपाचे रूप धारण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथे दर तासाला १७५ किमी वेगाने वारेही वाहणार असून मुसळधार पावसाचा देखील अंदाज आहे.

- Advertisement -

हवामान खात्याने येत्या पाच दिवसांचा अंदाज जाहीर केला असून यात गोवा आणि कोकणातील काही भागात याशिवाय रविवारी गोवा आणि दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीवर ताशी ५० ते ७० किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहे. तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह उपनगरात पहाटे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्यात.

मुख्यमंत्र्याच्या प्रशासनास सूचना

अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळाच्या अनुषंगाने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी किनारपट्टीवरील भागात पूर्णपणे सतर्कता ठेवावी तसेच विविध यंत्रणांनी सावध राहून आवश्यक ते बचाव कार्य करावे अशा सुचना प्रशासनास दिल्या. विशेषत: पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार असल्याने जिल्हाधिकारी यांनी सज्ज राहावे व मनुष्यबळ तसेच्या साधन सामुग्री तयार ठेवावी असेही मुख्यमंत्र्यांनी एका बैठकीत सांगितले. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीच्या पूर्वतयारीच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडून आढावा घेतला.

- Advertisement -

‘गरजू लोकांना शक्य ते सर्व मदत करा’

तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर केरळ, महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडू, गुजरात आणि कर्नाटकमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. तौक्ते चक्रीवादळाच्या अनुषंगाने आधीच अनेक भागात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांना गरजू लोकांना शक्य ते सर्व मदत करा, असे आवाहन केले आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -