घरताज्या घडामोडीCyclone Tauktae: तौत्के चक्रावादळाचा तडाखा बसलेल्या गुजरातला १ हजार कोटीची मदत, पंतप्रधान...

Cyclone Tauktae: तौत्के चक्रावादळाचा तडाखा बसलेल्या गुजरातला १ हजार कोटीची मदत, पंतप्रधान मोदींची घोषणा

Subscribe

तौत्के चक्रीवादळामधील मृतांच्या कुटूंबीयांना २ लाखांची मदत जाहीर

गुजरातमध्ये तौत्के चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या नुकसानग्रस्त भागाची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हवाई पाहणी दौरा केला. पंतप्रधान मोदींनी गुजरातच्या दीव-दमण, गिर-सोमनाथ, अमरेली, भावनगर या भागांची पाहणी केली. या भागांत चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. मोदींनी हवाई पाहणी दौरा केल्यानंतर अहमदाबादमध्ये चक्रीवादळातील नुकसानीची आढावा बैठक घेतली होती. या बैठकीनंतर गुजरातला १ हजार कोटींच्या मदतीची घोषणा केली आहे. यामध्ये तौत्के चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

गुजरातमध्ये समुद्र किनारी असणाऱ्या भागाला तौत्के चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. या भागातील घरे, झाडे, आणि लोखंडी विजेचे खांब कोलमडून पडले आहेत. यामुळे आतापर्यंत ४६ जणांचा विविध भागांत मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हवाई पाहणी दौरा केल्यानंतर अहमदाबादमध्ये आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीत नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेण्यात आला तसेच तात्काळ मदत जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये गुजरातला १ हजार करोड रुपयांची मदत देणयात आली आहे. ही मदत देण्यासाठी तसेच नुकसानीचे प्रमाण मोजण्यासाठी एक पथक तैनात करण्यात येणार आहे. या पथकाच्या अहवालानुसार मदत दिली जाणार आहे. तसेच पंतप्रधान मोदींनी राज्यातील जनतेला आश्वासित केले आहे की, केंद्र सरकार राज्य सरकारसोबत मिळून काम करेल, राज्यातील बाधित क्षेत्राला पुन्हा उभे करण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्यात येणार आहे.

- Advertisement -

तौत्के चक्रीवादळामधील मृतांच्या कुटूंबीयांना मदत

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात चक्री वादळाच्या तडाख्यामध्ये सापडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सामील असल्याचे म्हटले आहे. आपत्तीच्या काळात आपण सगळे एकजूट असल्याचेही मोदींनी म्हटलंय, या आपत्तीमध्ये मृत पावलेल्यांच्या कुटूंबीयांना २ लाख रुपयांची मदत मोदींनी जाहीर केली आहे. तर जखमींना ५० हजार रुपयांची मदतीची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींनी केरळ, कर्नाटक,गोवा,महाराष्ट्र,गुजरात, राजस्थान आणि केंद्र शासित प्रदेश दीव,दमन, दादरा नगर हवेलीमधील नागरिकांना आश्वासन दिले आहे की, कठीण प्रसंगात केंद्र सरकार नेहमी त्याच्या सोबत असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत मदतीची घोषणा केली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यांना तौत्के चक्रीवादळाचा फटका

महाराष्ट्राती समुद्र किनारपट्टीलगत असेल्या ५ जिल्ह्यांना तौत्के चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. वित्तहानीसह जिवितहानी देखील झाली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, मुंबई, पालघरमध्ये तौत्के चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी कोकण दौऱ्यावर गेले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही कोकण दौरा करणार असल्याची माहिती मिळते आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नुकसानीचे पंचनामे करुन तात्काळ मदत जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -