घरदेश-विदेशCoronavirus वर मात करण्यास DRDO-Dr Reddy’s यांचं औषध ठरणार Game Changer?

Coronavirus वर मात करण्यास DRDO-Dr Reddy’s यांचं औषध ठरणार Game Changer?

Subscribe

देशात कोरोनाचा कहर सुरू असून दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. दरम्यान, एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान, Coronavirus वर मात करण्यास DRDO-Dr Reddy’s यांचं औषध प्रभावी ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. कोरोनावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या याच औषधास डीसीजीआयने मान्यता दिली आहे. भारत सरकारच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) च्या प्रयोगशाळेतील न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्सेस (Inmas) यांनी डॉ. रेड्डी लॅब्जसह कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या Oral formulation म्हणजेच तोंडावाटे घेता येईल, असे औषध विकसित केलं आहे.

भारतात डीजीसीआयने २ डिऑक्सी-डी-ग्लूकोज (2-DG) या औषधाच्या आपतकालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. औषधाच्या क्लिनिकल ट्रायल्सच्या परिणामांनुसार, हे औषध रुग्णालयात दाखल केलेल्या कोरोना रूग्णांना लवकर बरे होण्यास मदत करते. यासह, रुग्णांला ऑक्सिजनची भासणारी आवश्यकता देखील कमी करण्यास मदत करते. हे औषध घेतलेल्या रूग्णांच्या आरटी-पीसीआर चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याचे रूग्णांच्या चाचणीतील तपासणीच्या निकालांमधून समोर आले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान, कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला सामोरे जाणाऱ्या भारतीय लोकांसाठी हे औषध खूप फायदेशीर ठरत असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

डीआरडीओचे चेअरमन डॉ. सतीश रेड्डी म्हणाले की, ११ किंवा १२ मेपासून हे कोरोनाचे औषध बाजारात उपलब्ध होणार आहे. यासह सुरुवातीला किमान १० हजार औषधांचे डोस बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे, असा जावा त्यांनी एका कार्यक्रमात केला आहे. डीआरडीओचे चेअरमन सतीश रेड्डी असेही म्हणाले, “डीआरडीओ आणि डॉ. रेड्डी लॅब यांनी बनविलेले हे औषध डीसीजीआयने मंजूर केले आहे. या औषधामुळे ऑक्सिजनवर अवलंबून असलेल्या कोरोना रूग्ण २ ते ३ दिवसांत ऑक्सिजनचा आधार घेणं सोडतील आणि तो रूग्ण लवकरात लवकर बरा होईल. लवकरच हे औषध सर्वत्र उपलब्ध होणार आहे. ” तसेच त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे औषध कोरोना रुग्णांना देण्यास सांगितले आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -