घरदेश-विदेशदेशात सक्रीय रुग्णांबरोबरच मृत्यूदरातही घट

देशात सक्रीय रुग्णांबरोबरच मृत्यूदरातही घट

Subscribe

भारताने कोविडविरुद्धच्या लढाईत अनेक महत्वाचे मैलाचे दगड पार केले आहेत. कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या तीन महिन्यांनंतर प्रथमच ५० हजारांपेक्षा कमी आढळली.

भारताने कोविडविरुद्धच्या लढाईत अनेक महत्वाचे मैलाचे दगड पार केले आहेत. भारताने मंगळवारी त्यात आणखी भर घातली. कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या तीन महिन्यांनंतर प्रथमच ५० हजारांपेक्षा कमी आढळली. देशामध्ये २४ तासांमध्ये ४६ हजार ७९० कोरोना रुग्ण सापडले, त्याचबरोबर कोविडचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असून, मृत्यूदरही सातत्याने घटत आहे. मंगळवारी मृत्यूदर १.५२ टक्के इतका आहे.

देशामध्ये २४ तासांत आढळलेल्या कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या सुमारे तीन महिन्यांनंतर ५० हजारांपेक्षा कमी झाली आहे. देशात ४६,७९० कोरोना रुग्ण सापडले आहेत. याआधी २८ जुलैला रुग्णांची एका दिवसातली संख्या ४७ हजार ७०३ असल्याची नोंद आहे. दररोज कोविडचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असून मृत्यूदरही सातत्याने घटतो आहे. तसेच सक्रीय रुग्णांचे प्रमाण देखील सातत्याने कमी होत आहे. सक्रीय रुग्णांचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा कमी झाले आहे. सध्या देशात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७.५ लाखांपेक्षाही कमी आहे. आजपर्यंतच्या कोविड रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत सक्रीय रुग्णांचे प्रमाण ९.८५ टक्के इतके आहे. सक्रीय रुग्णांच्या संख्येत घट होत असतांना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. आतापर्यंत ६७,३३,३२८ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. सक्रीय रुग्ण आणि बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येत ५९,८४,७९० इतकी तफावत आहे. २४ तासांत ६९,७२० रुग्ण बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. देशाचा रुग्ण बरे होण्याचा सरासरी दर ८८.६३ टक्के इतका आहे. कोविड रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक असलेला भारत एकमेव देश आहे. तसेच मृत्यूदर सर्वात कमी असलेल्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो. आज हा मृत्यूदर १.५२ टक्के इतका आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारच्या सर्वसमावेशक धोरणानुसार, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी, एकत्रित आणि निश्चित ध्येय ठेवून केलेल्या प्रभावी अंमलबजावणीचा हा परिणाम आहे.त्याशिवाय देशभरात चाचण्या, त्वरित आणि प्रभावी निरीक्षण आणि ट्रॅकिंग, रूग्णांना त्वरित रुग्णालयात दाखल करणे तसेच प्रमाणित उपचारांच्या प्रोटोकॉलचे कसोशीने पालन करण्यामुळे कोविडविरुध्दच्या लढ्यात हे यश मिळाले आहे. तसेच, या लढ्यात देशभर निस्वार्थ सेवा देणारे कोविड योद्धे, डॉक्टर्स, आघाडीवर काम करणारे सर्व कार्यकर्ते यांच्या निस्वार्थ सेवेचाही हा परिणाम आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -