घरताज्या घडामोडीJNU Attacke: दीपिका पदुकोण, कन्हैया कुमार जेएनयूत पोहोचले

JNU Attacke: दीपिका पदुकोण, कन्हैया कुमार जेएनयूत पोहोचले

Subscribe

जेएनयू मधील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने हीने जवाहरलाल नेहरू विद्यापीठ गाठलं. साबरमती टी-पॉईटंच्या इथे ती विद्यार्थ्यांनसोबत उभे असताना दिसून आलेली आहे. काही विद्यार्थ्यांनी दीपिकाचे विद्यापीठातील फोटो शेअर केले आहेत. याशिवाय जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार देखील निषेधार्थ जेएनयूमध्ये पोहचला आहे. तसंच नुकताचं या सर्व प्रसंगाचा व्हिडिओ एएनआयने देखील शेअर केला आहे.

- Advertisement -

सोमवारीपासून दीपिका पदुकोण ‘छपाक’ चित्रपटाच्या प्रमोशन करण्यासाठी दिल्लीत होती. रविवारी जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचाराबद्दल बोलताना दीपिकाने यापूर्वी एनडीटीव्हीला सांगितलं होत की, ‘जेव्हा लोक कोणतीही भीती न बाळगता आवाज उठवतात तेव्हा हे पाहून खूप आनंद होतो.’

- Advertisement -

‘मला हे सांगताना खूप अभिमान वाटतो की, आपण स्वतःला व्यक्त करण्यासाठी घाबरत नाही. आपण देश आणि त्याच्या भविष्याबद्दल विचार करीत आहोत, असं मला वाटतं आहे. आपला दृष्टीकोन काहीजरी असला तरी ते पाहून आनंद झाला’, असं दीपिकाने सोमवारी रात्री एनडीटीव्ही इंडियासोबत बोलताना सांगितलं.

पुढे दीपिका म्हणाली, ‘लोक बाहेर येत आहे याविषयी मला अभिमान वाटतो. रस्त्यावर असो किंवा कोठेही असो ते आवाज उठवित आहेत आणि स्वतःला व्यक्त करत आहेत हेच खूप महत्त्वाचं आहे. जर आपल्याला जीवनात आणि समाजात बदल घडवायचा असेल तर आपले विचार मांडणे महत्त्वाचं आहे.

सोमवारी रात्री मुंबईत कार्टर रोड येथे जेएनयू हल्लाविरोधात निषेध केला. दिग्दर्शक विशाल भारद्वाज, अनुराग कश्यप, जोया अख्यत, तापसी पन्नू आणि रिचा चड्ढा या बॉलिवूडच्या सेलिब्रिटी देखील या हल्ल्याविरोधात निषेध व्यक्त केला. एका बाजूला बॉलिवूडचे सेलिब्रिटी व्यक्त होत असले तरी दुसऱ्या बाजूला बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान यांनी याविषयी कोणताही प्रतिक्रिया दिलेली नाही.


हेही वाचा – हृतिक रोशन आणि सुझेन खान पुन्हा एकत्र!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -