हृतिक रोशन आणि सुझेन खान पुन्हा एकत्र!

हृतिक रोशन एक्स वाईफ आणि मुलांसोबत एकत्र व्हेकेशन एन्जॉय करताना दिसला.

hrithik roshan ex wife sussanne khan vacay pics with her modern family
हृतिक रोशन आणि सुझेन खान पुन्हा एकत्र!

आजकाल बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि त्यांची एक्स वाईफ व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहेत. यावेळी फक्त हे दोघे एन्जॉय करत नसून त्यांची दोन मुलं आणि संपूर्ण कुटुंब एकत्र व्हेकेशनचा आनंद घेताना दिसले. सुझेन खानने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून फॅमिली व्हेकेशनचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये संपूर्ण कुटुंबासमवेत ती दिसत आहे. यामुळे हृतिक रोशन आणि सुझेन खानबद्दलची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

तसंच सुझेनने ह्रतिक सोबत देखील फोटो शेअर केले आहेत. तिने या फोटोंना ‘मॉर्डन फॅमिली’ असं कॅप्शन दिलं असून ती कुटुंबासोबत मस्ती करताना दिसत आहे. याशिवाय ह्रतिकचे आई-वडील पिंकी आणि राकेश रोशन, दोन मुलं रेहान आणि रिदन, सुजनेची बहीण सुनैना आणि चुलत भाऊ एहसान आणि पश्मिना हे देखील फोटोमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे.

हे सर्व फोटो शेअर करताना तिने असं लिहिलं आहे की, ‘दी मॉर्डन फॅमिली – २ दोन मुलं, एक आई आणि एक वडिल, चुलत भाऊ, बहीण, आजी-आजोबा, आणि दोन मित्र. नवीन बंध. आयुष्यात रोजचा दिवस एखाद्यास सशक्त बनवते. २०२० आम्ही इथे आहोत.’

ह्रतिक रोशन आणि सुझेन खान बऱ्याचदा मुलांसोबत सुट्टीच्या दिवशी एन्जॉय करताना दिसतात. आता सुझेनने शेअर केलेले हे फोटो चाहत्यांना खूपचं आवडले आहेत. तसंच काही चाहत्यांनी तुम्ही पुन्हा लग्न केलं का? अशी प्रतिक्रिया या फोटोंना दिली आहे.


हेही वाचा – ‘मलंग’ चित्रपटाचा ट्रेलर पाहून टायगर श्रॉफची झाली ‘ही’ अवस्था