घरदेश-विदेशDelhi Saket Court Firing: दिल्लीत महिला साक्षीदारावर कोर्टाच्या आवारात गोळीबार

Delhi Saket Court Firing: दिल्लीत महिला साक्षीदारावर कोर्टाच्या आवारात गोळीबार

Subscribe

दिल्लीच्या साकेत कोर्टात शुक्रवारी गोळीबाराचा थरार रंगला. या गोळीबारात महिला गंभीर जखमी झाली आहे. तिला सध्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. हल्लेखोर वकिलांच्या ड्रेसमध्ये आला होता. त्याने 3 ते 4 राऊंड फायरींग केली आहे. जुन्या वादावरुन हल्लेखोराने महिलेवर गोळीबार केल्याचे बोलले जात आहे.

दिल्लीच्या साकेत कोर्टात शुक्रवारी गोळीबाराचा थरार रंगला. या गोळीबारात महिला गंभीर जखमी झाली आहे. तिला सध्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. हल्लेखोर वकिलांच्या ड्रेसमध्ये आला होता. त्याने 3 ते 4 राऊंड फायरींग केली आहे. जुन्या वादावरुन हल्लेखोराने महिलेवर गोळीबार केल्याचे बोलले जात आहे. भर दिवसा गोळीबार झाल्याने कोर्टात एकच खळबळ उडाली. न्यायालयात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता, तसंच मेटल डिटेक्टरही बसवण्यात आलं आहे. इतकी सुरक्षा असतानाही आरोपी बंदूक घेऊन कोर्टता शिरला कसा, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. एका प्रकरणात ही महिला न्यायालयात आली होती. ( Delhi Saket Court Firing Firing on a woman witness in the court premises in Delhi )

साकेत कोर्टात झालेल्या या घटनेने कोर्टाच्या सुरक्षा व्यवस्थेवरीह प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. न्यू फ्रेड्स काॅलनीशी संबंधित एका खटल्यात साक्ष देण्यासाठी महिला आली होती. त्यावेळी वकिलाच्या वेशात आलेल्या हल्लेखोरांनी तिच्यावर गोळीबार केला. समोर आलेल्या माहितीनुसार, या महिलेवर चार गोळ्या झाडल्या. हल्लेखोरांनी कोर्टात पिस्तुलासह प्रवेश केल्याने सुरक्षा व्यवस्थेत मोठी चूक असल्याचे समोर आले आहे, असे साकेत कोर्टातील वकिलांनी म्हटले.

- Advertisement -

याआधीही अशाच घटना घडल्यात

न्यायालयाच्या आवारात गोळीबाराची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षी 24 सप्टेंबर 2021 रोजी वकिलांच्या वेशात आलेल्या दोन सशस्त्र बदमाशांनी दिल्लीतील रोहिणी कोर्टात गोळीबार केला आणि ग‌‌ॅंगस्टर जितेंद्र मान उर्फ गोगीची हत्या केली. यानंतर पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तरादाखल कारवाईत राहुल त्यागी आणि जगदीप जग्गा हे दोन्ही बंदुकधारी हल्लेखोर जागीच ठार झाले. दोन्ही हल्लेखोर वकिलांच्या वेशात कोर्टरुममध्ये घुसले होते.

( हेही वाचाL Coronavirus : देशात 24 तासांत 11 हजार 683 कोरोना रुग्णांची नोंद, तर 28 रुग्णांचा मृत्यू )

- Advertisement -

मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात रोहिणी कोर्टात दोन वकील आणि त्याच्या एका अशीलाला जोरदार मारहाण झाली होती. त्यानंतर गोळीबारही झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोर्टात तैनात असलेल्या नागालॅंड सशस्त्र पोलीस दलाच्या शिपायाने जमिनीवर गोळी झाडली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -