दिल्ली हिंसाचार: नाल्यात सापडले मृतदेह; मृतांचा आकडा ४६ वर

delhi violence news 3 more bodies found in violence hit part of northeast delhi overall deaths
दिल्ली हिंसाचार: नाल्यात सापडले मृतदेह; मृतांचा आकडा ४६ वर

ईशान्य दिल्लीत हिंसाचारात ४६ जणांनी प्राण गमावल्याची संख्या समोर आली आहे. हिंसाचार ग्रस्त भागातून आणखीन तीन मृतदेह बाहेर काढल्यानंतर मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे. यातील एक मृतदेह गोकुळपुर नाल्यातून तर बाकीचे दोन मृतदेह भागीरथी विहार मधील नाल्यात सापडले असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. यापूर्वी गुरू तेगबहादुर हॉस्पिटलमध्ये ३८ लोकांना तर एलएनजेपी हॉस्पिटलमध्ये तीन जणांना मृत घोषित करण्यात आलं होत. या मृत घोषितांमध्ये एका पोलीस हवालदारचा समावेश होता. चार दिवसांपासून सुरू असलेल्या या दिल्लीच्या हिंसाचारात २०० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. यामध्ये ११ पोलिसांचा समावेश आहे. यामध्ये अमित शर्मा आणि अनुज कुमार शर्मा या दोन पोलिसांचा मृत्यू झाला आहे. या हिंसाचाराच्या चौकशीसाठी दिल्ली पोलीस गुन्हे शाखेची दोन एसआयटी टीम तैनात करण्यात आली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी सांगितलं की, ‘देशाच्या राजधानीतील आम आदमी पार्टीचे सरकार ईशान्य दिल्लीतील हिंसाचारातील पीडित लोकांना मदत करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.’ तसंच केजरीवाल यांनी पीडितांना मदत करण्यासाठी ट्विटरच्या माध्यमातून लोकांना मदतीच आवाहन केलं होत. दिल्लीतील लोकांकरिता २४ तास आपला पक्ष कार्यरत असल्याचं सांगितलं होत.


हेही वाचा – देश तोडणार्‍यांच्या मनात भय उत्पन्‍न करा