घरताज्या घडामोडीLata Mangeshkar : कोरोना तू आमचा आवाज चोरलास, तुझा तिरस्कार करतो ;...

Lata Mangeshkar : कोरोना तू आमचा आवाज चोरलास, तुझा तिरस्कार करतो ; लतादीदींच्या निधनानंतर आनंद महिंद्रांचं भावुक ट्विट

Subscribe

भारतरत्न गानकोकीळा लता मंगेशकर यांचं काल(रविवार) सकाळी मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात निधन झालं. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशात शोक व्यक्त केला जात आहे. राजकीय क्षेत्र, कलाविश्व, क्रिकेट अशा सर्वच स्तरातून संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली जातेय. उद्योग क्षेत्रातूनही लतादीदींच्या जाण्याने शोक व्यक्त करण्यात आला आहे. ट्विटरवर नेहमी चर्चेत आणि सक्रीय असणाऱ्या महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी लतादीदींच्या निधनानंतर ट्विटच्या माध्यमातून अखेरचा निरोप दिला आहे.

कोरोना तू जाता खूप वाईट काम केलंस. तू आमचा आवाज चोरलास. त्यामुळे मी तुझा तिरस्कार करतो, अशा प्रकारचं ट्विट आनंद महिंद्रा यांनी करत भावना व्यक्त केल्या आहेत.

- Advertisement -

लतादीदींच्या निधनामुळे केंद्राच्या गृह विभागाने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. तर राष्ट्रध्वजही अर्ध्यावर उतरवण्यात आला. महाराष्ट्र सरकारने लता मंगेशकर यांच्या निधनामुळे सोमवार ७ फेब्रुवारी रोजी एक दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात दादरच्या शिवाजी पार्क मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. महाराष्ट्राप्रमाणेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही सोमवारी एक दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

- Advertisement -

लतादीदींचं निधन

गेल्या २८ दिवसांपासून मुंबईच्या ब्रीच कॅंडी रूग्णालयात लतातदीदींवर उपचार सुरू होते. लतादीदींना कोरोनाचा संसर्ग झाला होता. कोरोनावर मात केल्यानंतर त्यांची चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यानंतर लतादीदींवर न्यूमोनियावर उपचार सुरू होते. पण शनिवारपासूनच त्यांची प्रकृती अधिक खालावत गेली. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. पण रविवारी सकाळी ८.१२ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.


हेही वाचा : OBC Reservation : राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सादर


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -