घरCORONA UPDATECorona : हे Device हवेतच पकडणार कोरोनाचे विषाणू; लवकरच येणार बाजारात

Corona : हे Device हवेतच पकडणार कोरोनाचे विषाणू; लवकरच येणार बाजारात

Subscribe

जगभरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. अशात यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोरोना विषाणू नेमका आहे कुठे हे ओळखणे गरजेचे आहे. यासाठी आता एक नवे डिव्हाईस बनवण्यात आले असून लवकरच ते बाजारात येणार असल्याचे सांगितले जात आहे. कॅनडातील एका कंपनीने असे डिव्हाईस बनवल्याचा दावा केला आहे. हे डिव्हाईस हवेतील कोरोना विषाणूला ओळखू शकणार आहेत. कंट्रोल एनर्जी कॉर्प (Kontrol Energy Corp) या कंपनीने हे डिव्हाईस बनवले आहे.

या कंपनीने इनडोअर एअर क्वालिटी आणि मॉनिटरिंग इक्विपमेंट बनवण्याचे काम या पूर्वीच सुरू केले होते. कोरोनाच्या संकटकाळात त्यांनी कोरोना विषाणूला ओळखणारा डिव्हाईस बनण्यास सुरूवात केली. कंपनीने कॅनेडातील आँटरियोमधील दोन प्रयोग शाळेत कोरोना विषाणूवर चाचण्या केल्यानंतर बायोक्लाऊड नावाचे डिव्हाईस तयार केले आहे. हे डिव्हाईस हँड ड्रायरसारखे दिसते. मात्र यात हवा आतल्या बाजूला खेचली जाते. यात गेलेल्या हवेचे परिक्षण कोरोनाच्या चाचणीकरता केले जाते.

- Advertisement -

यासंबंधीत ग्लोबलन्यूज डॉट कॉमने दिलेल्या रिपोर्टनुसार, कंपनीच्या मते त्यांचे डिव्हाईत हवेत कोरोनाचे विषाणू आहेत की नाही हे ओळखते. जर रिझल्ट पॉझिटिव्ह आला तर तेथे उपस्थित लोकांची स्वतंत्र चाचणी करता येईल. शाळा, कॉलेज, कार्यालये अशा ठिकाणी या डिव्हाईसचा वापर केला जाऊ शकतो. ही कंपनी नोव्हेबरच्या दरम्यान हे डिव्हाईस बाजारात आणू शकते. ज्याची किंमत ८० लाख रुपये असेल. या कंपनीला जगभरातून डिव्हाईससाठी मागण्यादेखील येत आहेत, असे सांगितले जाते.

हेही वाचा –

मुंबईत फक्त ५ हजारांत बोगस जन्म, मृत्यु, विवाह प्रमाणपत्र; एकाला अटक!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -