घरमुंबईसाथीच्या आजारांवर नियंत्रण; मात्र लेप्टो, डेंग्यूचे आव्हान

साथीच्या आजारांवर नियंत्रण; मात्र लेप्टो, डेंग्यूचे आव्हान

Subscribe

सप्टेंबरमध्ये लेप्टोचे ५४ तर गॅस्ट्रोचे ९१ रुग्ण सापडले आहेत. तर लेप्टोने एकाचा बळी घेतला आहे. तसेच मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आले आहे. मात्र सप्टेंबरमध्ये लेप्टो व गॅस्ट्रोच्या रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडले आहेत. सप्टेंबरमध्ये लेप्टोचे ५४ तर गॅस्ट्रोचे ९१ रुग्ण सापडले आहेत. तर लेप्टोने एकाचा बळी घेतला आहे. तसेच मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

जुलै-ऑगस्टमध्ये झालेल्या पावसामुळे साथीच्या आजारांनी डोके वर काढले होते. एकीकडे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या पालिका प्रशासनाला साथीच्या आजारांचाही सामना करावा लागत होता. पालिकेने जाहीर केलेल्या सप्टेंबरपर्यंतच्या अहवालामध्ये मुंबईमध्ये मलेरियाचे ६६१, गॅस्ट्रो ९१, लेप्टोचे ५४, हेपटाईटीस १५ आणि डेंग्यूचे १४ रुग्ण आणि स्वाईन फ्ल्यूचा अवघा एक रुग्ण सापडला आहे. त्याचबरोबर लेप्टोमुळे एकाचा मृत्यू झाला आहे. यावरून ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. मात्र गॅस्ट्रो, लेप्टो, हेपेटाईटीस, डेंग्यू या आजारांच्या रुग्णांच्या संख्येत किंचितशी वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने पालिकेसमोर मलेरियाचे आव्हान निर्माण झाले होते. मात्र पालिकेने योग्य उपाययोजना करत मलेरियाचे वाढते रुग्ण नियंत्रण आणण्यात यश मिळवले आहे.

- Advertisement -

table

१६ वर्षीय मुलाचा लेप्टोने मृत्यू

एफ नॉर्थमधील १६ वर्षीय तरुणाचा लेप्टोने मृत्यू झाला. ३१ ऑगस्टपासून त्याला ताप, थंडी, डोकेदुखी, अंगदुखी आणि अशक्तपणा, श्वास घ्यायला त्रास ही सर्वसाधारण लक्षण होती. त्यामुळे त्याला २ सप्टेंबरला रुग्णालयात दाखल करण्यात आले. ४ सप्टेंबरला त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या.

- Advertisement -

 

साचलेल्या पावसाच्या पाण्यातून जास्त वेळ चाललेल्या व्यक्तींनी ७२ तासांच्या आत उपचार करुन घ्यावेत. खासगी हॉस्पिटलमध्येही तापाच्या रुग्णांना डॉक्सी सुरू करण्याच्या सुचना दिल्या आहेत. श्वासोच्छवासाचा त्रास होत असेल तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
– डॉ. मंगला गोमारे, कार्यकारी आरोग्य अधिकारी, मुंबई महापालिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -