घरदेश-विदेशदिग्विजय यांची पत्नी अमृताचा राजकारणात प्रवेश

दिग्विजय यांची पत्नी अमृताचा राजकारणात प्रवेश

Subscribe

मध्य प्रदेशच्या राजकारणात नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. नुकतीच सोशल मीडियावर कॉंग्रेसच्या उमेदवारांची एक यादी व्हायरल होत असून यामध्ये कॉंग्रेसच्या भविष्यातील ५२ आमदारांची नावं देण्यात आली आहेत. अद्याप तरी कॉंग्रेसच्या वतीने या माहिती दुजोरा देण्यात आला नसला तरी यातून वेगळीच माहिती समोर येत आहे. या यादीत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांच्या पत्नी अमृता राय या बुधनी मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दिग्विजय आणि अमृता राय चर्चेत आले आहेत.

यांच लग्न होता चर्चेचा विषय

कॉंग्रेसच्या सरचिटणीसपदी असलेल्या दिग्विजय सिंग यांनी २०१५ साली टीव्ही अँकर अमृता राय यांच्याशी लग्नगाठ बांधली होती. वय वर्ष ६८ दिग्विजय यांनी ४४ वर्षीय अमृताशी लग्न केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. तर अमृताने केवळ संपत्ती हडपण्यासाठी दिग्विजय यांच्याशी लग्न केल्याचा आरोप सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आला होता. मात्र आपण पैशासाठी नाही तर दिग्विजय यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी विवाह केल्याचे स्पष्टीकरण तिने त्यावेळी दिले. दिग्विजय सिंग यांचा हा दुसरा विवाह होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -