घरदेश-विदेश'त्या' भारतीय पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांची ट्रम्प यांनी घेतली भेट

‘त्या’ भारतीय पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांची ट्रम्प यांनी घेतली भेट

Subscribe

कॅलिफोर्निया पोलीस विभागात कार्यरत असलेला भारतीय वंक्षाचा रोनील सिंगची हत्या करण्यात आली होती. या घटनेला काही दिवस उलटल्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याच्या कुटुबींयाची भेट घेतली आहे.

कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या भारतीय पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भेट दिली आहे. या अधिकाऱ्याची हत्या करणाऱ्या गुडांना लवकर पकडण्याचे आदेश ट्रम्प यांनी दिले आहे. कॅलिफोर्निया पोलीस विभागात कार्यरत असलेल्या एका भारतीय वंक्षाच्या पोलीस अधिकाऱ्याची गोळी मारून हत्या करण्यात आली होती. ही घटना नाताळच्या रात्री घडली होती. रोनील सिंग (३३) असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव होते. त्याच्या मृत्यू पश्चात त्याची पत्नी अनामिका आणि पाच महिन्याचा मुलगा असे कुटुंब आहे. रोनील  २०१० पासून कॅलिफोर्नि पोलीस दलात कार्यरत होता. त्यांच्या मृत्यूचा त्याच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. दरम्यान पोलिसांनी या घटनेत गुन्हा नोंदवला असून आरोपींचा तपास सुरु केला आहे. रोनीलला श्रद्धांजली म्हणून कॅलिफोर्निया पोलिसांनी ट्विटवर त्याचा एक व्हिडिओ शेअर केला होता.


कसा घडला होता प्रकार 

रोनील सिंगला नाताळच्या दिवशी अधिक वेळ काम करावे लागले होते. त्यादिवशी घरातून निघाल्यानंतर रोनीत रस्त्यावर धावत असलेल्या गाड्यांवर लक्ष ठेवत होता. रोनीलला एक गाडी संक्षयास्पद वाटली. त्याने या गाडीला थांबण्याचे आदेश दिले. गाडी थांबवल्यावर रोनीलने चालकाला ओळखपत्र मागीतले मात्र घाबरलेल्या चालकाने रोनीलवर गोळी झाडली व घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेनंतर रोनीलला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याला डॉक्टरांनी मृत घोषीत केले. पोलिसांनी सीसीटीवीच्या आधारावर या संक्षयीत आरोपीचे फोटो प्रसारित केले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -