डोनाल्ड ट्रम्प यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोरोना पॉझिटिव्ह

Donald Trump's National Security Adviser Corona Positive

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराला कोरोनाचा संर्ग झाला आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन यांना कोरोनाची लागण झाली आहे. ट्रम्प प्रशासनातील उच्च दर्जाच्या अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचं हे पहिलं प्रकरण आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रॉबर्ट ओ ब्रायन यांच्यात शेवटची भेट कधी झाली होती हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. १० जुलैला दोघे एका कार्यक्रमात एकत्र दिसले होते. रॉबर्ट ओ ब्रायन यांना कोरोनाची लक्षणं दिसत असून त्यांनी स्वत:च विलगीकरण केलं आहे. राष्ट्रीय परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी प्रसारमाध्यमांमधूनच आपल्याला रॉबर्ट ओ ब्रायन यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाल्याचं सांगितलं आहे.