घरताज्या घडामोडीUttarpradesh : रामपूरमध्ये लग्न समारंभातून परतलेल्यांच्या गाडीला भीषण अपघात ; 5 जणांचा...

Uttarpradesh : रामपूरमध्ये लग्न समारंभातून परतलेल्यांच्या गाडीला भीषण अपघात ; 5 जणांचा मृत्यू

Subscribe

उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये शुक्रवारी 4 फेब्रुवारीला एका कारला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रामपूरमध्यो एका वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटून त्या कारने ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात गाडीमध्ये चालकासह 6 जण होते. या अपघातात वाहनचालक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये शुक्रवारी 4 फेब्रुवारीला एका कारला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रामपूरमध्यो एका वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटून त्या कारने ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात गाडीमध्ये चालकासह 6 जण होते. या अपघातात वाहनचालक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

रामपूर जिल्ह्यातील तांडा पोलीस स्टेशन परिसरात ही दुर्घटना घडली आहे. कारमधील सर्व 6 जण यूपी-उत्तराखंड सीमेवर असलेल्या स्वार शहरात लग्नाला गेले होते. लग्न आटोपल्यानंतर मुरादाबाद येथील आपल्या घरी परतत होते. यादरम्यान कारचे नियंत्रण सुटले आणि समोरून जाणाऱ्या ट्रकवर धडकली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्याचबरोबर जखमी चालकाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

तांडाचे एसडीएम राजेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, तांडाच्या शिकमपूर भागात हा अपघात झाला. घटनास्थळाजवळ क्रॉसरोड आहे. येथील स्पीड ब्रेकरवरून पुढे गेल्याने कारचे नियंत्रण सुटले असल्याची शक्यता वर्तवली आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेले लोक मुरादाबादमधील जयंतीपूरचे रहिवासी होते. हे लोक सर्वजण इको वाहनातून प्रवास करत होते. ही अनियंत्रित कार कोणत्या ट्रकला धडकली याचाही शोध घेतला जात आहे.

- Advertisement -

उन्नावमध्ये पोलिस व्हॅनवर ट्रक उलटला, 3 पोलिसांचा मृत्यू

याशिवाय शुक्रवारी रात्री उन्नावमध्ये पीआरव्हीवर ट्रक उलटल्याने भीषण अपघात झाला होता. पीआरव्हीमध्ये बसलेले सर्व पोलीस ट्रकखाली गाडले गेले. क्रेन मागवून ट्रक पीआरव्हीच्या वरून बाजूला करण्यात आला. या घटनेत तीन हवालदारांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक दिनेश त्रिपाठी यांनी दिली. ही घटना सफीपूर कोतवाली हद्दीतील करौंडी येथून इनोव्हा एसआर पेट्रोल पंप सफीपूरकडे जात होती. उन्नावकडून सफीपूरकडे भरधाव वेगात असलेला ट्रक अनियंत्रितपणे उलटला.


हे ही वाचा – India Corona Update : देशात 1 लाख 27 हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद, पॉझिटिव्हीटी रेट 8 टक्क्यांनी घटला


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -