Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश New Zealand Earthquake : न्यूझीलंड भूकंपाने हदरले, कोणतीही जीवित-वित्तहानी नाही

New Zealand Earthquake : न्यूझीलंड भूकंपाने हदरले, कोणतीही जीवित-वित्तहानी नाही

Subscribe

भूकंपाचा केंद्रबिंदू जमीनीखाली दहा किलोमीटर होता. भूकंपात कोणत्याही जीवितहानीची माहिती नाही. तसेच सुनामीचा कोणताही धोका नाही, अशी माहिती देण्यात आली आहे.

New Zealand Earthquake वेलिंगटन (न्यूझीलंड) – न्यूझीलंड भूकंपाने हदरले आहे. सोमवारी सकाळी न्यूझीलंडमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने (एनएससी) या संबंधी माहिती दिली आहे. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 7.2 नोंदवण्यात आली आहे. सकाळी 6.11 वाजता न्यूजीलंडच्या केर्माडेक बेटावर हा भूकंप झाला आहे. या भूकंपात मोठी हानी झाली नसल्याची माहिती आहे.

एनएससीने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू जमीनीखाली दहा किलोमीटर होता. भूकंपात कोणत्याही जीवितहानीची माहिती नाही. तसेच सुनामीचा कोणताही धोका नाही, अशी माहिती देण्यात आली आहे.

- Advertisement -

हवामान बदलामुळे संपूर्ण जग सध्या चितांग्रस्त आहे. कुठे बर्फ वितळत आहे, तर कुठे उन्हाळ्यात शीत लहर येत आहे. तर कुठे अवकाळी पाऊस सुरु आहे. निसर्गचक्र विस्कळीत झाल्याने अशा घटना वाढत आहेत.

गेल्या महिन्यात न्यूझीलंडमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले होते. तेव्हाही केर्माडेक बेटाजवळ जमीन हादरत होती. त्यानंतर भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.1 एवढी होती.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -