घरताज्या घडामोडीइमानाले इसरला त्याले नेक म्हणू नही.., भाजपची उद्धव ठाकरेंवर टीका

इमानाले इसरला त्याले नेक म्हणू नही.., भाजपची उद्धव ठाकरेंवर टीका

Subscribe

जळगावच्या पाचोऱ्यात काल(रविवार) ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. या सभेतून उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्य सरकारवर टीका केली आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी जल्म्दात्याले भोवला त्याले लेक म्हणू नही.., असं म्हणत ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधला होता. परंतु ते कवितेच्या पुढील ओळी विसरले होते. त्याचीच आठवण करून देत भाजपने आपल्या ट्वीटर हॅण्डलवरून उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे.

उद्धवजी, तुम्ही पाचोऱ्यात आले. महाकवयित्री बहिणाबाई यांची कविता ऐकवली. पण तुमचं सगळंच सोयीस्कर आहे. ही कविताही तुम्ही तुमच्या प्रमाणे ऐकवली, अगदी सोयीस्कर!, “जल्म्दात्याले भोवला त्याले लेक म्हणू नही..” इतकीच एक ओळ तुम्ही जनतेला ऐकवली पण तुम्ही सोयीस्कर गाळलेली पुढची ओळ अशी आहे : ‘इमानाले इसरला त्याले नेक म्हणू नही. जल्म्दात्याले भोवला त्याले लेक म्हणू नही’, ‘ज्याच्यामधी नाही भाव त्याले भक्ती म्हनु नही, ज्याच्यामधी नाही चेव त्याले शक्ती म्हणू नही’, अशी कविता ट्वीट करत भाजपने ठाकरेंवर टीका केली.

- Advertisement -

ठरवून फक्त कवितेच्या ओळी गाळता येतात उद्धवजी, जनतेला विश्वासात घेण्यासाठी नियत साफ लागते, असं देखील भाजपने म्हटलं आहे.

- Advertisement -

दरम्यान, आमचे सरकार देणार आहे, घेणारे नाही. मी घरी बसून सरकार चालविले. मी घरी बसून जे करू शकलो ते तुम्ही वणवण करून करू शकणार नाही. मी घरी बसून केले म्हणून ही माणसं आज आलीत. घराणेशाहीवर तुम्ही बोलताय ना, मी फकीर आहे. असे सांगत आहेत. तुमच्या मागे पुढे कोणी नाही, अरे कधीतरी झोळी लटकवून निघून जाल, माझ्या जनतेच्या हाती कटोरा देऊन, म्हणून घराणे चांगले लागले, असा टोला उद्धव ठाकरेंनी मोदींना लगावला.


हेही वाचा : Summer Special Trains: कोकणवासीयांना डावलत रेल्वेची परप्रातींयासाठी धावाधाव


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -