घरदेश-विदेशMadhya Pradesh: आफ्रिकेतून आणलेल्या आणखी एका चित्त्याचा मृत्यू

Madhya Pradesh: आफ्रिकेतून आणलेल्या आणखी एका चित्त्याचा मृत्यू

Subscribe

मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला आहे. उदय नावाच हा चित्ता आज कुनो नॅशनल पार्कमध्ये आजारी पडला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला आहे. उदय नावाच हा चित्ता आज कुनो नॅशनल पार्कमध्ये आजारी पडला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशचे मुख्य वनसंरक्षक जेएस चौहान यांनी त्याच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे.

दक्षिण आफ्रिकेतून आणल्यानंतर मागच्या दोन महिन्यांत मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्त्याचा हा दुसरा मृत्यू आहे. देशात आणलेल्या 20 चित्त्यांपैकी 6 वर्षांचा उदय हा एक होता. अद्याप चित्त्याच्या मृत्यूचे कारण समजू शकलेले नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच नेमकं कारण स्पष्ट होणार आहे. ( Madhya Pradesh Another cheetah brought from South Africa dies )

- Advertisement -

काही दिवसांपूर्वीच कुनो पार्कमध्ये मादी चित्ता साशा हिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता उदय या चित्त्याचा मृ्तयू झाला आहे. वन विभागच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास चित्ता उदय मान खाली घालून जमिनीवर पडलेला दिसून आला. त्याच्याजवळ गेल्यानंतर तो लंगडत चालताना दिसला. त्यानंतर याची सूचना वन्यप्राणी चिकित्सकांना देण्यात आली. त्यानंतर उदयची तपासणी केल्यानंतर तो आजारी असल्याचे समजले. उदयला उपचारासाठी ट्रॅकुलाईज केलं. त्यानंतर बेशुद्ध करुन त्याच्यावर उपचार सुरु केले होते. मात्र, उदयची प्रकृती पाहून त्याला पुढील उपचार आणि निरीक्षणासाठी आयसोलेशन वाॅर्डमध्ये ठेवलं होतं. मात्र, रविवारी चार वाजण्याच्या सुमारास उदयचा मृत्यू झाला.

- Advertisement -

( हेही वाचा: New Zealand Earthquake : न्यूझीलंड भूकंपाने हदरले, कोणतीही जीवित-वित्तहानी नाही )

यापूर्वी पाच वर्षांच्या नामिबियातील चित्ता साशा हिचा किडनीच्या संसर्गामुळे गेल्या महिन्यात मृत्यू झाला होता. कुनो नॅशनल पार्कमध्ये धावणाऱ्या चित्त्यांच्या पहिल्या तुकडीचा एक भाग होती आणि गेल्या वर्षी नामिबियाहून आलेल्या पाच मादी चित्त्यांपैकी ती एक होती.  दक्षिण आफ्रिकेतून भारतात आणलेल्या 20 चित्त्यांपैकी आता 18 चित्ते उरले आहेत. पंतप्रधान मोदींच्या हस्ते यातील 8 चित्ते कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले होते. यातील दोन चित्त्यांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -