घरट्रेंडिंगEdible Oil: २०२०-२१मध्ये खाद्यतेलांच्या आयातीत ६३ टक्क्यांची वाढ, १.१७ लाख करोड...

Edible Oil: २०२०-२१मध्ये खाद्यतेलांच्या आयातीत ६३ टक्क्यांची वाढ, १.१७ लाख करोड रुपयांच्या तेलाची खरेदी

Subscribe

वनस्पती तेल, खाद्य तेल आणि अखाद्य तेलाचा यात समावेश आहे

भारतात खाद्य तेलाची आयात ऑक्टोबर महिन्याच्या अखेरिस म्हणजेच वर्ष २०२०-२१मध्ये जवळपास १३१.३ लाख टनावर स्थिर झाला होता. मात्र तेल उद्योगाच्या आकड्यांच्या आधारे खाद्यतेलांची आयात ६३ टक्क्यांनी वाढून १.१७ लाख करोड रुपये इतकी झाली आहे. वनस्पती तेल, खाद्य तेल आणि अखाद्य तेलाचा यात समावेश आहे. सॉल्वेट एक्सट्रैक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार,  २०२०-२१ वर्षात वनस्पती तेलांची आयात १३५.३१ लाख टन नोंदवण्यात आली आहे. तर २०१९-२० वर्षात हीच संख्या १३५.२५ लाख टन इतकी होती. वनस्पती तेलांची आयात मागील सहा वर्षात दुसऱ्यांदा कमी झाल्याचे यात म्हटले गेले आहे. आकडेवारीनुसार, खाद्य तेलांचे आयात वर्ष २०२०-२१मध्ये १३१.७५ लाख टनावरुन घट होऊन १३१.३१ लाख टनावर आले. खाद्य तेलांची आयात ३,४९,१७२ टनावरुन वाढून ३९९,८२२ टन झाली आहे.

 

- Advertisement -

एसईएने दिलेल्या माहितीनुसार, खाद्य तेलाची आयात २०२०-२१ वर्षात १,१७,००० करोड रुपये झाले. ही किंमत २०१९-२० वर्षात ७१,६२५ करोड रुपये झाली होती. एसोसिएशनच्या म्हणण्यानुसार, भारत सरकारकडून गेल्या काही महिन्यात खाद्य तेलांच्या आयात शुल्कात सातत्याने बदल होत असल्याने आयातीचे व्यवहार बिघडले आहेत. २०१९-२० वर्षात ४.२१ लाख टन तुलनेत २०२०-२१ मध्ये रिफाइंड तेलाच्या आयातीत थोडी वाढ होऊन ६.८६ लाख टन झाली. त्याचप्रमाणे कच्चा तेलांच्या आयातीत १२७.५४ लाख टन तुलेनत थोडी घट होऊन १२४.४५ लाख टन झाली.

इंडोनेशिया आणि मलेशिया भारताला आरबीजी पामोलिन आणि कच्चा पामतेलाचा पुरवठा करणारे प्रमुख पुरवठादार आहेत. कच्चे सोयाबीन तेल मुख्यत: अर्जेटीना आणि ब्राझीलहून आयत केले जातात. त्याचप्रमाणे कच्चे सूर्यफूल तेल यूक्रेन,रशिया आणि अर्जेटीना येथून आयात केले जाते. १ नोव्हेंबर रोजी खाद्य तेलांच्या विविध बंदरांवर तेलांचे स्टॉक ५,६५,००० टन आणि पाइपलाइन स्टॉक ११,४०,००० टन झाल्याने अनुमान काढण्यात आले. तर १ ऑक्टोबरला स्टॉकमध्ये २०.०५ टक्क्यांनी घट झाली.

- Advertisement -

हेही वाचा – Home Loan Interest Rate: SBI आणि Bank of Baroda सह ‘या’ बँका देत आहेत स्वस्तात लोन

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -