घरक्रीडाभारतीय संघाच्या भविष्याबाबत प्रशिक्षक आणि हिटमॅन रोहित शर्माने मांडली महत्त्वाची भूमिका

भारतीय संघाच्या भविष्याबाबत प्रशिक्षक आणि हिटमॅन रोहित शर्माने मांडली महत्त्वाची भूमिका

Subscribe

खेळाडूंच्या मानसिक आणि शारीरिक क्षमतेवर लक्ष ठेवावं लागणार...

भारत विरूद्ध न्यूझीलंड संघात १७ नोव्हेंबरपासून टी-२० मालिकेला सुरूवात होणार आहे. भारतीय संघाचे नवीन प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी आज(मंगळवार) पत्रकार परिषद घेतली होती. दोन्ही खेळाडूंनी मालिकेबाबत अनेक गोष्टी आणि टीम इंडियाच्या भविष्याबाबत मोठा खुलासा केला आहे.

कामाचा भार सांभाळावा लागणार ?

आपल्याला कामाचा भार सांभाळावा लागणार आहे. मागील ६ महिन्यांपासून सर्व खेळाडू सतत खेळत आहेत. फुटबॉलच्या खेळासारखं क्रिकेटमध्ये सुद्दा आपल्याला हे नियम सुरू करावे लागतील. खेळाडूंच्या मानसिक आणि शारीरिक क्षमतेवर लक्ष ठेवावं लागणार आहे. असे भारतीय संघाचे नवे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सांगितलं आहे. त्यांनी पुढे सांगितलं की, नवीन खेळाडूंसाठी चांगली संधी आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, सर्व खेळाडू या मालिकेमध्ये चांगलं प्रदर्शन करतील. मी खेळाडूंसोबत काम करण्यास खूप उत्सुक आहे. आमच्या जवळ चांगले खेळाडू आहेत. असं राहुल द्रविड म्हणाला.

- Advertisement -

प्रशिक्षकाबाबत राहुलने व्यक्त केलं मत?

प्रत्येक वेळी प्रशिक्षकांची शिकवण्याची शैली वेगळी असते. १९ वर्षाखालील खेळात देखील साम्य नसते. खेळाडूंना चांगलं शिक्षण दिल्यानंतर ते उत्तर प्रकारे खेळू लागतात.

कर्णधार विराट कोहलीवर रोहितचं वक्तव्य…

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने सांगितलं की, प्रत्येक सामना खेळण्यासाठी सर्व खेळाडू मशीन नाहीयेत. आम्ही या मालिकेतील अनेक खेळाडूंना विश्रांती दिली आहे. पुढील भरवण्यात येणाऱ्या क्रिकेट सामन्यांमध्ये मानसिक स्थिती राखणं खूप गरजेचे आहे.

- Advertisement -

विराट कोहलीची भूमिका काय?

विराट कोहलीची या सामन्यात भूमिका कायम राहणार आहे. आतापर्यंत त्याने जेकाही संघासाठी केलंय. तिचे काम त्याला पुढे करावे लागणार आहे. कारण हे भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे. प्रत्येक खेळात प्रत्येक खेळाडूची भूमिका महत्त्वाची असते. प्रत्येकजण त्यासाठी तयार आहेत. विराटचा अनुभव आणि फलंदाजी करत ते संघाला अधिक मजबूत करू शकतात.

असा असेल भारतीय संघ ?

रोहित शर्मा (कर्णधार) ,केएल राहुल(उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, ईशान किशन, वेंकटेश अय्यर (ऑलराऊंडर), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -