घरताज्या घडामोडीEdible oil : भारतात खाद्य तेल स्वस्त होणार, मुख्य पाच कारणे काय...

Edible oil : भारतात खाद्य तेल स्वस्त होणार, मुख्य पाच कारणे काय ?

Subscribe

सणासुदीच्या कालावधीत खाद्य तेलाच्या दराच्या निमित्ताने ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. खाद्य तेल निर्मितीमधील अनेक मोठ्या कंपन्यांनी खाद्यतेलाच्या किंमती या घाऊक विक्रीत लिटरमागे सरासरी ४ ते ७ रूपये कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. अदाणी विलमार आणि रूची सोया या कंपन्यांनी तेलाचे दर तत्काळ कमी करून टाकले आहेत. त्यासोबतच इतर खाद्यतेल निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांचे तेलाचे दरही कमी होण्याचे संकेत आहेत. खाद्य तेल निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सॉल्वंट एक्स्ट्रॅक्टर असोसिएशन (SEA) ने जाहीर केल्यानुसार हे दर कमी होणार आहेत.

खाद्यतेलाचे दर कमी होण्याची पाच कारणे –

१) इतर खाद्यतेल निर्मिती कंपन्यांमध्ये जेमिनी एडिबल्स, फॅट्स इंडिया, मोदी नॅचरल्स, गोकुळ रिफॉईल्स आणि सॉल्वंट, विजय सॉलवेक्स, गोकुळ अॅग्रो रिसोसर्स आणि एन के प्रोटिन्स या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांकडूनही घाऊक किंमती कमी केल्याचे कळते. या कंपन्यांनी SEA ने अपिल केल्यानंतर खाद्य तेलाच्या किंमती कमी केल्या आहेत. ग्राहकांना दिलासा देण्यासाठीच संघटनेने अपिल केल्यानंतर हा दिलासा कंपन्यांनी दिला आहे. कंपन्यांकडून तत्काळ मिळालेला प्रतिसाद खूपच प्रोत्साहन देणारा असल्याचे SEA चे अध्यक्ष अतुल चतुर्वेदी यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

२) कंपन्यांनी घाऊक किंमती या ४ हजार रूपये ते ७ हजार रूपये प्रति टन कमी करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच इतर कंपन्यांनीही आगामी कालावधीत खाद्यतेलाच्या किंमती कमी करण्याचे स्पष्ट केले असल्याचे चतुर्वेदी म्हणाले. या दरकपातीचा परिणाम म्हणजे तेलाची घाऊक बाजारपेठेतील सरासरी ४ रूपये ते ७ रूपये इतकी किंमत कमी होणार आहे. संघटनेचे अध्यक्ष चतुर्वेदी या दरकपातीची कारणेही दिली आहेत.

३) स्थानिक पातळीवर सोयाबीन आणि शेंगदाणाच्या पिकामुळे मोठ्या प्रमाणात वाढलेली उपलब्धतता हेच कारण आहे. राईच्या पिकाची लागवडही तेलाच्या उत्पादनाच्या आकडेवारीच्या दृष्टीने महत्वाची मानली जात आहे. परिणामी आगामी काळात तेलाच्या उपलब्धतेत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

४) जागतिक पातळीवर खाद्यतेलांच्या उपलब्धतेत वाढ होत आहे. त्यामुळे परिस्थिती सुधारत असून येत्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. परिणामी स्थानिक बाजारपेठेतील दरावरही याचा परिणाम होईल, असेही ते म्हणाले. भारत खाद्यतेलाच्या बाबतीत इंडोनेशिया, ब्राझील तसेच आणखी देशांवर हे तेल आयातीसाठी अवलंबून आहे. भारतातील खाद्यतेलाच्या मागणीची गरज ही ६० टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात आयातीच्या तेलाच्या माध्यमातून पूर्ण होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर खाद्यतेलाच्या दरातील चढ उताराचा परिणाम हा थेट स्थानिक पातळीवर तेलाच्या किंमतीवर होत असतो.

५) खाद्यतेलाचा वाढलेला भाव पाहता, केंद्र सरकारने गेल्या काही दिवसांमध्ये या किंमती कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या. त्यामध्ये आयात शुल्क ऑक्टोबर महिन्यात कमी करण्यात आला. त्याचा परिणाम हा तेलाच्या किंमती कमी होण्यावर झाला. तसेच स्थानिक बाजारपेठेतही तेलाचे दर कमी होण्यासाठी मदत झाली, असा दावा एसईएने केला आहे.


हेही वाचा – निवडणूक काळात १-२ रुपयांची दरकपातही भारी पडेल, महागाईच्या मुद्द्यावर प्रियांका गांधींचा भाजपला इशारा

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -