घरदेश-विदेशट्विटरला हवाय पाच पट नफा!

ट्विटरला हवाय पाच पट नफा!

Subscribe

2028 पर्यंत 26.4 अब्ज डॉलरचा नफा अपेक्षित

जगातील सर्वांत लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरला ताब्यात घेतल्यापासून उद्योजक आणि टेस्ला कंपनीचे सीईओ इलॉन मस्क यांच्या आशावादाला नवे धुमारे फुटू लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच सरकारी आणि खासगी कंपन्यांकडून ट्विटर वापरासाठी शुल्क वसुलीचा मानस असल्याची इच्छा बोलून दाखवल्यानंतर आता मस्क यांनी आपला नवा प्लान जाहीर केला आहे. या प्लाननुसार मस्क यांना ट्विटरकडून 2028 पर्यंत 26.4 अब्ज डॉलरचा नफा अपेक्षित आहे.

इलॉन मस्क यांनी नुकतेच गुंतवणूकदारांपुढे एक प्रेझेंटेशन सादर केले. यामध्ये ट्विटर सब्सक्रिप्शन मोडवर घेऊन जाण्याचा कंपनीचा प्लान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या माध्यमातून 2028 पर्यंत 26.4 अब्ज डॉलरचा नफा होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. हा नफा गेल्या वर्षी ट्विटरला झालेल्या नफ्याच्या पाच पट आहे. गेल्या वर्षी ट्विटरला 5 अब्ज डॉलर एवढा नफा झाला होता. मस्क यांनी काही दिवसांपूर्वी मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरला 44 अब्ज डॉलर म्हणजेच 3 हजार 368 अब्ज कोटी रुपयांना खरेदी केले आहे.

- Advertisement -

प्रतियूजर 30.22 डॉलरचा नफा
इलॉन मस्कच्या अंदाजानुसार ते 2028 पर्यंत ट्विटरच्या प्रतियूजर सरासरी नफ्याला 30.22 डॉलरपर्यंत वाढवू शकतात. गेल्या वर्षी ही सरासरी 24.83 डॉलर एवढी होती. गेल्या वर्षी ट्विटरने प्रीमियम सब्सक्रिप्शन सेवा ट्विटर ब्लूला सुरुवात केली होती. 2025 पर्यंत ट्विटरकडे ही सेवा घेणारे 69 दशलक्ष यूजर्स होतील, असे त्यांना वाटत आहे.

जाहिरातींपासून मुक्तता
ट्विटर जाहिरातींपासून मुक्त करण्याची मस्क यांची इच्छा असून तसे झाल्यास ट्विटरच्या एकूण नफ्यातील वाटा 45 टक्क्यांपर्यंत घसरू शकेल, तर 2020च्या तुलनेत 2028 पर्यंत हा जाहिरातीतील नफ्याचा वाटा 90 टक्क्यांपर्यंत घसरेल. मस्क यांच्या प्लाननुसार 2028 मध्ये जाहिरातीतून 12 अब्ज डॉलर आणि यूजर्स सब्सक्रिप्शनच्या माध्यमातून 10 अब्ज डॉलर मिळतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -