आता कोका-कोला विकत घेईन जेणेकरून कोकेन मिसळता येईल; एलन मस्क यांचे धक्कादायक ट्विट

elon musk tweets that he is buying coca cola to put the cocaine back
आता कोका-कोला विकत घेऊन जेणेकरून कोकेन मिसळता येईल; एलन मस्क यांचे धक्कादायक ट्विट

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला कंपनीचे सीईओ एलन मस्क ट्विटर हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकत घेतल्यापासून जगभरात चर्चेत आहेत. ट्विटर खरेदीचा त्यांचा निर्णय अनेकांसाठी आश्चर्यकारक ठरला. अशात त्यांना आता कोका कोला कंपनी विकत घेण्याची घोषणा केली आहे. मात्र या घोषणेबरोबर त्यांनी असं काही लिहिले आहे जे वाचून अनेकांच धक्का बसला आहे. मस्क यांनी लिहिले की, आता मी कोका कोला कंपनी विकक घेऊन जेणेकरून मला कोकेन मिसळता येईल. मस्क यांच्या ट्विटवर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे, या ट्विटला आत्तापर्यंत लाखो युजर्सनी लाईक्स आणि रिट्विट केले आहे. या ट्विटनंतर काही वेळातच मस्क यांनी आणखी एक ट्विट केले. यात त्यांनी म्हटले की, ट्विटरला अधिक मनोरंजक ठिकाण बनवायला हवे. आता त्यांनी जे लिहिले ते खरोखर किंवा विनोदाने लिहिले पण, मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून युजर्स त्यांना अनेक गोष्टी विकत घेण्यास सांगत आहेत.

कोका कोला खरेदी करण्यासंदर्भातील ट्विटनंतर आता त्यांनी या ट्विटला काही वेळात रिप्लाय देत लिहिले की, रेड बुलला हरवायचे आहे. मस्क यांनी आधीच्या ट्विटचा स्क्रीनशॉट देखील पोस्ट केला ज्यामध्ये त्यांनी म्हटले की, मी मॅकडोनाल्ड खरेदी करणार आहे आणि सर्व आइस्क्रीम मशीन ठीक करणार आहे. या ट्विटला त्यांनी गमतीने स्वतःलाच उत्तर दिले की, ऐका, मी चमत्कार करू शकत नाही.

मस्कने मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटर विकत घेण्यासाठी 44 बिलियन डॉलर म्हणजेच 3,368 अब्ज रुपयांची डील केली. Twitter च्या प्रत्येक शेअरसाठी 54.20 डॉलर, (रु. 4,148) दिले आहेत. ट्विटरमध्ये त्यांची आधीपासून 9 टक्के भागीदारी होती. ते ट्विटरचे सर्वात मोठे शेअरहोल्डर होते. मात्र ही कंपनी आता मस्क यांच्या मालकीची झाली असून कंपनीमध्ये त्यांची 100 भागीदारी असून ट्विटर ही खाजगी कंपनी बनली आहे.

एलन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. ते टेस्ला कंपनीचे सीईओ आहेत. नुकताच ते आता ट्विटर कंपनीचे मालक झाले आहे. एलन मस्क हे स्पेस एक्सचे संस्थापक आहेत. टाइम मासिकाने २०२१ मध्ये त्यांना पर्सन ऑफ द इयर म्हणून घोषित केले. त्यात ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत, ज्यांच्याकडे सुमारे 20.68 लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे.


summer specials train: खुशखबर! मध्य रेल्वेकडून प्रवाशांसाठी 574 विशेष ट्रेन