घरदेश-विदेशमहापौर- उपमहापौर निवडणुकीआधीच दिल्ली मनपात हंगामा, भाजपा-आप नगरसेवकांत धक्काबुक्की

महापौर- उपमहापौर निवडणुकीआधीच दिल्ली मनपात हंगामा, भाजपा-आप नगरसेवकांत धक्काबुक्की

Subscribe

नवी दिल्ली : महापौर आणि उपमहापौर निवडणुकीच्या आधी दिल्ली महापालिकेत मोठा गदारोळ झाला. पीठासीन अधिकाऱ्यांनी प्रथम नामनिर्देशित सदस्यांचा शपथविधी घेतल्याने आम आदमी पार्टीच्या (AAP) नगरसेवकांनी गदारोळ केला. मतदान सुरू होण्यापूर्वी आप आणि भाजपा (BJP) नगरसेवकांमध्ये धक्काबुक्की झाली. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली आणि कागदपत्रेही फेकण्यात आली.

महापौर आणि उपमहापौरव्यतिरिक्त स्थायी समितीच्या 6 सदस्यांचीही आज, शुक्रवारी निवडणूक होणार आहे. उपमहापौरपदासाठी मतिया महल वॉर्डातील आपचे नगरसेवक आले मोहम्मद इक्बाल आणि भाजपा उमेदवार कमल बागडी यांच्यामध्ये लढत होणार आहे. याशिवाय स्थायी समितीच्या सहा सदस्यपदांसाठी सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी 4 आपचे आणि 2 भाजपाचे आहेत. गजेंद्र दाराळ यांनी यापूर्वी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

- Advertisement -

नायब राज्यपालांनी महापालिकेत नगरसेवक म्हणून नामनिर्देशित केलेल्या 10 जणांचा भाजपाशी थेट संबंध असल्याचे सांगितले जाते. महापालिकेत भाजपा विरोधी पक्ष आहे. अशा परिस्थितीत या नामनिर्देशित नगरसेवकांची उपस्थिती दिल्ली महापालिकेत भाजपाला राजकीय बळ देऊ शकते, अशी भीती आम आदमी पार्टीला वाटत आहे.

- Advertisement -

नामनिर्देशित नगरसेवकांना महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत मतदान करता येणार नाही. मात्र स्थायी समिती सदस्य आणि क्षेत्रीय सभापतींच्या निवडणुकीत ते मतदान करू शकतात. त्यामुळे दिल्ली महापालिकेत धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या स्थायी समितीतील आम आदमी पक्षाची समीकरणे बिघडू शकतात. क्षेत्रीय निवडणुकीतही त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळेच या नामनिर्देशित नियुक्तीला आपचा तीव्र विरोध आहे.

डिसेंबरमध्ये झालेल्या दिल्ली महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवले. यामुळे दिल्ली महापालिकेवरील भाजपाची 15 वर्षांची सत्ता संपुष्टात आली. आपने 250 पैकी 134 जागा जिंकल्या. तर भाजपा 104 आणि काँग्रेसला 9 जागा मिळाल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -