घरताज्या घडामोडीHema Malini On Hijab Controversy: 'शाळेच्या गणवेशाचा सन्मान करायला हवा'

Hema Malini On Hijab Controversy: ‘शाळेच्या गणवेशाचा सन्मान करायला हवा’

Subscribe

शाळेच्या बाहेर तुम्ही काहीही करू शकता काहीही घालू शकता तिथे तुमच्यावर कोणाची सक्ती नसते', असे हेमा मालिनी यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याचे अनेकांनी समर्थनही केले.

Hema Malini On Hijab Controversy : कर्नाटक राज्यात सुरू असलेल्या हिजाब वादावर अनेक स्तरातून प्रतिक्रिया येत आहे. अभिनेते कमल हसन यांच्यानंतर अभिनेत्री आणि भाजप नेत्या हेमा मालिनी ( Hema Malini) यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. ‘शाळा या शिक्षण घेण्यासाठी असतात तिथे धार्मिक बाबी आणायच्या नसतात. प्रत्येक शाळेच्या गणवेशाचा आपण सन्मान केला पाहिले.  शाळेच्या बाहेर तुम्ही काहीही करू शकता काहीही घालू शकता तिथे तुमच्यावर कोणाची सक्ती नसते’, असे हेमा मालिनी यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याचे अनेकांनी समर्थनही केले.

- Advertisement -

त्याचप्रमाणे केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी देखील याचं मुद्द्यावर म्हटले आहे की, ‘कोणत्याही संस्थेच्या ड्रेस कोड, अनुशासन आणि सन्मान राखण्याच्या निर्णयाला असा जातीय रंग देणे हे भारतीय संस्कृती विरोधात केलेले षडयंत्र आहे. देशात सर्व संस्थाच्या सर्व सुविधांवर सर्वांचा समान अधिकार आहे’.

‘कर्नाटकात जे सुरू आहे त्याने अशांतता निर्माण होत आहे. खोट न बोलणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये धर्मिक विषारी भिंत उभी केली जात आहे. त्यामुळे कर्नाटकाच्या शेजारील राज्यांनी आता सावध राहणे गरजेचे आहे. कर्नाटकातील वाद तमिळनाडूत येता कामा नये’, अशी प्रतिक्रिया अभिनेते आणि मक्काल निधी मय्यमचे अध्यक्ष कमल हसन यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा –  Karnataka Hijab Row: हिजाब वादाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र पडसाद, भारतविरोधात मुस्लीम राष्ट्रे…

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -