घरदेश-विदेशBengal Election 2021: TMC नेत्याच्या घरातून EVM आणि VVPAT जप्त; EC कडून...

Bengal Election 2021: TMC नेत्याच्या घरातून EVM आणि VVPAT जप्त; EC कडून सेक्टर अधिकाऱ्याचे निलंबन

Subscribe

मंगळवारी आज विधानसभा निवडणूकीसाठी पश्चिमबंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पद्दुचेरी या राज्यात विधानसभेच्या जागेसाठी मतदार प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, पश्चिम बंगाल राज्यात आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू असून तेथे ३१ जागांवर हे मतदान होत आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत पश्चिम बंगालमधील उलुबेरिया या मतदार संघातील TMC अर्थात तृणमूल काँग्रेसचे नेते गौतम घोष यांच्या घरात EVM आणि VVPAT आढळल्याने मतदार संघात एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

वृत्तसंस्था एएनआयने निवडणुक आयोगाच्या हवाल्याने असे सांगितले की, तृणमूल काँग्रेस नेत्याच्या घराजवळ EVM आणि VVPAT आढळल्यानंतर निवडणूक आयोगाकडून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई अंतर्गत या भागातील एका विभाग अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, तृणमूल नेत्याच्या घराजवळ आढळलेले एक रिझव्ह मशीन होते. आज पार पडणाऱ्या तिसऱ्या टप्प्यात या मशीनचा वापर मतदानासाठी केला जाणार नव्हता, अशी माहिती सांगितली जात आहे. तर विभागीय अधिकारी तपन सरकार EVM सोबत आपल्या कुटुंबियांच्या घरी झोपण्यासाठी गेले होते आणि नियमांच्या विरोधातील असून नियमांचे उल्लंघन केले आहे.

यासर्व घटनेनंतर या प्रकरणात ज्यांचा सहभाग असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा निवडणूक आयोगाने दिला असून भाजपाने ममता बॅनर्जी यांच्यासह TMC वर जोरदार हल्लाबोल केला आहे. यानंतर TMC नेत्याच्या घराजवळून EVM आणि VVPAT जप्त करण्यात आले असून TMC नेत्याकडे EVM आणि VVPAT कसे आढळून आले याचा सखोल तपास निवडणूक आयोगाकडून सध्या सुरू आहे.

- Advertisement -

आसाममध्येही भाजप उमेदवाराच्या गाडीत EVM सापडले

दरम्यान, यापूर्वी देखील १ एप्रिल रोजी पार पडलेल्या पश्चिम बंगाल आणि आसाम राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर अनेक वाद झाले होते. यावेळी आसाममध्ये भाजप उमेदवाराच्या गाडीत EVM मशीन आढळले होते. या प्रकऱणाचा तपास करण्यासाठी जिल्हा मॅजिस्ट्रेटकडून आदेश देण्यात आला आहे. करीमगंज जिल्हा उप-अधीक्षक अनबामुथन यांनी या प्रकरणाचा तपास करण्याचा आदेश दिला असून EVM प्रकरणात यापूर्वीच निवडणूक आयोगाने ४ अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते. या प्रकारानंतर निवडणूक आयोगाने पुन्हा निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांना सविस्तर अहवाल देण्याचे आदेश दिले असल्याचेही सांगितले जात आहे.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -