घरदेश-विदेशचंदा कोचर यांच्या घरावर ईडीचे छापे

चंदा कोचर यांच्या घरावर ईडीचे छापे

Subscribe

आयसीआयसीआय बँकेचा लोन गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयने आज कारवाई केली आहे. आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका आणि मुख्याधिकारी चंदा कोचर यांच्या घरावर छापे टाकण्यात आले आहेत.

आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका आणि मुख्याधिकारी चंदा कोचर यांनी लोनमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोपाअंतर्गत केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) चौकशी करत आहे. आज चंदा कोचर यांच्या घरावर ईडीने छापे मारले आहेत. नंदा कोचर आणि व्हिडीओकॉन समुहाचे अध्यक्ष वेणुगोपाळ वेणुगोपाळ यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापे मारण्यात आले होते. मुंबई आणि औरंगाबाद येथील कार्यालयावर छापे मारण्यावर आले होते. व्हिडीओकॉनला आयसीआयसीआय बँकेने ३ हजार २५० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले होते. या कर्जात गैरव्यवहार झाल्याच्या संशयावरून चंदा कोचर यांची चौकशी सुरु आहे. आतापर्यंत  सीबीआय ने फक्त कागदोपत्र आणि चौकशी केली होती मात्र या प्रकरणी आता छापेही मारले गेले आहेत. या चौकशीत अजून काही मोठ्या लोकांची नावे समोर येणार असल्याचे सांगितले जात आहे.

काय आहे प्रकरण

चंदा कोचर यांचे पती दीपक आणि व्हिडीओकॉनचे प्रमुख धूत यांनी २००८ मध्ये ५०-५० टक्के भागिदारीत न्यूपॉवर रिन्यूएबल प्रा.लि.ची (एनआरपीएल) स्थापना केली होती. परंतु, धूत यांनी एका महिन्यानंतर कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता आणि यातील आपले भाग दीपक यांच्या नावावर हस्तांतरित केले होते. याच दरम्यान २०१२ मध्ये व्हिडीओकॉनला आयसीआयसीआयबँकेने ३ हजार २५० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले होते. यामध्ये २ हजार ८४९ रुपयांचे कर्ज अजूनही थकीत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -