घरदेश-विदेशकारगिल युद्धाची माहिती आडवाणींना होती!

कारगिल युद्धाची माहिती आडवाणींना होती!

Subscribe

कारगिल युद्ध होणार असल्याची गुप्त माहिती भाजपचे जेष्ठ नेते आणि तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण आडवाणी यांना असल्याचा गौप्यस्फोट रॉ चे माजी प्रमुख अमरजीत सिंह दुलत यांनी केला आहे.

कारगिल युद्ध होणार असल्याची गुप्त माहिती भाजपचे जेष्ठ नेते आणि तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण आडवाणी यांना असल्याचा गौप्यस्फोट रॉ चे माजी प्रमुख अमरजीत सिंह दुलत यांनी केला आहे. कारगिल युद्ध हे गुप्तचर विभागामुळे झाल्याची माहिती आतापर्यंत समोर येत होती. मात्र दुलत यांच्या वक्तव्यानंतर एक वेगळेच चित्र समोर येत आहे. रॉ माजी प्रमुख बरोबरच दुलत हे १९९९ मध्ये झालेल्या कारगिर युद्धाच्यावेळी इंटेलिजन्स ब्युरोमध्ये होते. शनिवारी चंदीगडमध्ये सैन्य साहित्य मोहत्सवाला संबोधित करताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला. या कार्यक्रमाला निवृत्त लेफ्टनंट जनरल कमल डावर, रॉचे माजी प्रमुख के. सी. वर्मा आणि निवृत्त लेफ्टनंट जनरल संजीव लंगर ही उपस्थित होते.

काय म्हणाले दुलत

कारगिल युद्धापूर्वी काही संदिग्ध हालचालींची आम्हाला माहिती मिळाली होती. त्यावर भाष्य करत आम्ही ही माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाला दिली होती. युद्ध होण्या अगोदर आडवाणींना माहिती होती. जम्मू- काश्मीर आणि उत्तर पूर्वमध्ये रोज होणारे ऑपरेशन केवळ ३० टक्के गुप्त माहितीच्या आधारावर असतात. कोणीही संपूर्ण गुप्त माहिती येईपर्यंत थांबू शकत नाही. प्रत्येक अपयशाचे खापर गुप्तचर यंत्रणांवर फोडणे चुकीचे आहे. भारतीय व्यवस्थेत सर्व गुप्तचर यंत्रणांवर सोडून चालणार नाही, हे व्यवस्थेचे अपयश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -