घरदेश-विदेशफेसबुकवरील 'फेक' मजकुरावर बसणार चाप

फेसबुकवरील ‘फेक’ मजकुरावर बसणार चाप

Subscribe

फेसबुकवर पसरवल्या जाणाऱ्या खोट्या मजकुरावर आळा घालण्यासाठी फेसबुकने पाऊले उचलली आहेत. अशा मजकुरावर आळा घालण्यासाठी प्रत्येक विभागामधील अकाऊंट्सवर फेसबुक बारकाईने लक्ष ठेवणार आहे. फेसबुकवर पोस्ट केलेले आक्षेपार्ह भाषण, एखाद्या देशातील संवेदनशील मुद्यावरील मजकूर हा फेसबुक त्वरीत काढून टाकणार आहे. वापरकर्त्यांची संख्या पाहून असे करणे हे एक मोठे आवाहन असल्याचे उत्पादन व्यवस्थेचे उपाध्याक्ष गाय रोझेन यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले. फेक पोस्टला आळा घालण्यासाठी फेसबुक पोस्टची प्रादेशिक स्तरावर विशेष तपासणी करण्यात येणार आहे.

फेसबुकने पहिल्याच वेळी जाहीर केलेल्या जागतिक आकडेवारीप्रमाणे, २०१८च्या सुरुवातीच्या पहिल्या तीन महिन्यांत हेट स्पीच संबधित (आक्षेपार्ह भाषण) २.४५ दशलक्ष अकाऊंट्सची ओळख पटली आहे. २०१७ ला हाच आकडा १.६१ दक्षलक्ष एवढा होता. फेसबुकवर फेक अकाऊंट्सची आकडेवारी ही मोठी असून यामधील बऱ्याच अकाऊंट्समधून आक्षेपार्ह मजकूर, फोटो, व्हिडीओ आणि बातम्या प्रसिद्ध करण्यात येतात. याचे सर्वासामान्य नागरिकांवर अनेक दुष्परिणाम होतात. त्यामुळेच प्रादेशिक स्तरावर तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

फेसबुक ही आज सोशल मिडियातील अग्रेसर कंपनी म्हणून ओळखली जाते. जगातील एकूण लोकसंख्येपैकी एक मोठा वर्ग फेसबुक वापरत असल्याने फेसबुकवरील मजकूर हा त्या लोकांपर्यंत प्रसारित होतो. अनेकदा महापुरुषांची विटंबना, खोट्या बातम्या आणि आक्षेपार्ह मजकूर या सोशल साईट्सवर सर्रास प्रकाशित केल्या जातात. अशा वेळी तपासणी करणे शक्य होत नाही. त्यामुळे प्रादेशिक स्तरावर तपासणी करण्यासाठी एक विशेष पथक नेमण्यात येणार आहे.

याबाबत माहिती देताना उत्पादन व्यवस्थेचे उपाध्याक्ष गाय रोझेन यांनी सांगितले की, “फेसबुकचा जगासमोर असलेला मानक टिकवून ठेवणे गरजे असल्यामुळे ही पाऊले उचलण्याची गरज आहे. एखाद्या समुदायासाठी आक्षेपार्ह असलेला मजकूर हा दुसऱ्या समाजासाठी तसाच असेल असे नाही. वेगवेगळ्या संस्कृतीचे दृष्टीकोन हे वेगळे असणार असे मत फेसबुकचे चेअरमन मार्क झुकरबर्ग यांनी मांडले होते. फेसबुकवर केलेल्या पोस्टमुळे कोणतेही दुष्परिणाम होत असतील तर अशा पोस्ट त्यावेळीच काढणे आवश्यक आहेत. यासाठी प्रादेशिक स्थरावर साफ मजकूर पोस्ट केला जाणे आवश्यक आहे. ”

- Advertisement -

वर्ष २०१८ – सुरुवातीच्या तीन महिन्यांची आकडेवारी
अकाऊंट्स                    मजकूर टक्केवारी                           संख्या
अॅडल्ट मजकूर                       ९५.८०%                      २,०९,८४,८९२
फेक अकाऊंट्स                     ९८.५०%                      ५,८३,३६,९११
हेट स्पीचेस                            ३८%                           २४,५४,१३३
दहशतवादी मजकूर                   ९९.५०%                      १८,५८,३५५

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -