घरमनोरंजनमालदीवमध्ये आलियाने फ्रेंड्सोबत केला 'कहो ना प्यार है' या गाण्यावर डान्स;

मालदीवमध्ये आलियाने फ्रेंड्सोबत केला ‘कहो ना प्यार है’ या गाण्यावर डान्स;

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट देखील इतर स्टार्स प्रमाणेच आपल्या सुट्ट्या मालदीवमध्ये घालवत आहेत. हे व्हेकेशन एन्जॉय करताना आलियाने तिचे मालदीवचे काही फोटो आणि व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. मालदीवमधील आलियाच्या या फोटोंनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. आलियाच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर या फोटोंना पसंती देत त्यावर भरभरून प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. दरम्यान, आलियाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात ती ‘कहो ना प्यार है’ या गाण्यावर तिच्या फ्रेंड्सोबत डान्स करताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by FAN PAGE 🤍 (@hereforaliaabhatt)

- Advertisement -

या व्हायरल होणाऱ्या आलियाच्या डान्स व्हिडिओमध्ये आलिया भट्ट तिच्या मैत्रीणी अनुष्का, आकांक्षासह बहीण शाहिन हिच्यासोबत मालदीवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे. मालदीवमधील आलियाची धम्माल, मस्ती तिने चाहत्यांसह शेअर केली आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये आलिया, अनुष्का आणि आकांक्षा ‘कहो ना प्यार है’ या गाण्याच्या काही डान्स स्टेप करताना दिसताय़. याशिवाय आकांक्षानंही तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला असून ज्या व्हिडिओमध्ये या सर्वजण मालदीवच्या समुद्र किनाऱ्यावर लंच करताना दिसताय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt)

- Advertisement -

आलियाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, आलिया शेवटची सडक २ या चित्रपटामध्ये दिसली होती. तर आता रणबीर कपूरसह आलियाची फिल्म ब्रम्हास्त्र लवकरच प्रदर्शित होणार असून चाहते तिच्या या आगामी चित्रपटाची आवर्जून वाट पाहत आहे. यासह आलिया संजय लीला भन्सालींचा गंगूबाई काठियावाडी या चित्रपटात देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -