घरदेश-विदेशभारत बंद! पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी अडवला महामार्ग-रेल्वे ट्रॅक; १८ ट्रेन्स रद्द

भारत बंद! पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी अडवला महामार्ग-रेल्वे ट्रॅक; १८ ट्रेन्स रद्द

Subscribe

संयुक्त किसान मोर्चाने आज भारत बंदची घोषणा केली आहे. हजारो शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत. दिल्लीतही निदर्शने तीव्र करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस हाय अलर्टवर आले आहेत. अशा परिस्थितीत पोलिसांनी त्याला सामोरे जाण्यासाठी सविस्तर तयारी आज करण्यात आली आहे. नव्या कृषी कायद्यांविरोधात संयुक्त किसान मोर्चाने भारत बंदची हाक देण्यासाठी सोमवारी शेतकरी रस्त्यावर उतरले. शेतकऱ्यांनी दिल्ली-जम्मू रेल्वे मार्गावरील पठाणकोट रेल्वे कॅन्ट स्टेशनजवळ रेल्वे क्रॉसिंगच्या मध्यभागी ट्रॅक्टर उभे केले आहेत. जम्मू-जालंधर बायपास आणि राष्ट्रीय महामार्ग देखील पंजाब-हिमाचल सीमेवरील दमाताळ येथे प्रचंड ट्रॉली उभारून बंद करण्यात आला होता.

आज भारत बंद असल्यामुळे रेल्वेने १८ हून अधिक रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. फिरोजपूर ते लुधियाना जालंधर भटिंडा आणि अमृतसर ते पठाणकोट आणि जालंधर, अमृतसर ते फाजिल्का या सर्व ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर तीन कृषी कायद्यांचा निषेध करणारे आंदोलक अमृतसरच्या देवीदासपुरा या गावात रेल्वे ट्रॅकवर आंदोलनला उतरले आहेत. शेतकरी संघटनांनी राजकीय पक्ष, कामगार संघटना, शेतकरी संघटना, युवक, महिला आणि प्रत्येक विभागाने देशातील शेती वाचवण्यासाठी किसान आघाडीला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. किसान मोर्चा सोमवारी सकाळी ६ ते दुपारी ४ पर्यंत धरणे आंदोलन करणार आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, भारत बंदच्या घोषणेनंतरच दिल्ली पोलिसांनी १५ जिल्ह्यांच्या पोलिसांना सतर्क केले आहे. आज दिल्लीची सीमा, नवी दिल्ली भागात आणि लाल किल्ल्याच्या आसपास मोठ्या संख्येने पोलीस दल आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले होते. जोपर्यंत शेतकर्‍यांचे आंदोलन संपेपर्यंत पोलिसांचा फौजफाटा तैनात असणार असल्याची माहिती मिळतेय.


 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -